Headlines

रणवीर आणि दीपिकाने लपूनछपून केलेला साखरपुडा! अभिनेता खुलासा करत म्हणाला, ‘कोण चप्पल…’

[ad_1]

Ranveer Singh and Deepika Padukone got engaged secretly : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो येण्याची सगळेच आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. त्याचा आठवा सीझन हा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोचा पहिल्या गेस्टची चर्चा सुरु होती. चाहत्यांना जाणून घ्यायचे होते की पहिले गेस्ट कोण असणार आहेत. तर त्याचा खुलासा आता झाला आहे. शोचे पहिले गेस्ट हे बॉलिवूडची सुपरकूल जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आहेत. 

त्याचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे दोघेच पहिले गेस्ट आहेत हे स्पष्ट झालं आहे. यावेळी त्या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांच्या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रणवीर आणि दीपिका या व्हिडीओत खूप मस्ती करताना दिसत आहे. तर यावेळी रणवीरनं खुलासा केला की त्यानं आणि दीपिकानं 2015 मध्येच एन्गेजमेंट केली होती. त्यावेळी त्यानं तिला प्रपोज केलं होतं. याविषयी सांगत रणवीर म्हणाला ‘2015 मध्ये मी तिला प्रपोज केलं होतं. कोणी दुसरं येण्याआधी मी चप्पल ठेवली.’ (चप्पल रणवीरनं हा जो उल्लेख केला आहे, त्याचा अर्थ इझे कोणी संधी साधण्याआधी त्यानेच संधी साधत दीपिकाला प्रपोज केलं.) तेव्हा लगेच दीपिका म्हणाली ‘एडव्हान्स बूकिंग.’

पाहा व्हिडीओ – 

व्हायरल व्हिडीओत रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची स्तुती करत करण जोहर त्यांना तुम्ही दोघंसोबत ‘स्मोकी हॉट’ दिसत आहात. यावर लगेच रणवीर म्हणाला की ‘ठरकी अंकल’. तर करण जोहर म्हणाला, तुझ्याशी मी नंतर बोलेन. हे ऐकल्यावर दीपिका लगेच हसू लागते. 

करण जोहरनं पुढे दीपिकाला प्रश्न विचारला की तिची कोणासोबत केमिस्ट्री चांगली दिसते. त्याचं उत्तर देत दीपिकानं म्हटलं की हृतिक रोशनसोबत केमिस्ट्री चांगली दिसेल, त्याच्यासोबत मी चित्रपट देखील करणार आहे. फायटर या चित्रपटात दिसणार आहे. दोघे पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

याशिवाय दीपिकाला करणनं विचारलं की रॉकी और रानी की प्रेम कहानीमधील रणवीरची रॉकी रंधावाच्या भूमिकेला तू डेट केलं असतं का. यावर मस्करी करत दीपिका उत्तर देते की मी रॉकी रंधावाशी लग्न केलं आहे. 26 ऑक्टोबर रोजी या सीझनचा पहिला एपिसोड आपल्याला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 

दीपिका आणि रणवीर विषयी बोलायचे झाले तर त्यांनी 14 नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न केलं होतं. त्या आधी दोघे काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांविषयी अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देतो त्यांच्या अॅक्शनवरून त्यांच्यात किती प्रेम आहे हे आपल्याला पाहायला मिळते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *