Headlines

‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यामुळे Arijit Singh Live Concert बेरंग, चाहत्यांसाठी वाईट बातमी!

[ad_1]

Arijit Singh Live Concert Got Cancelled In Kolkata : बॉलिवूडचा लोकप्रिय प्लेबॅक गायक अरिजीत सिंग (Arijit Singh) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. अरिजित सिंगचे लाखो चाहते आहेत. लग्न असो किंवा कोणती पार्टी अरिजीत सिंगची गाणी ही नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतात. अरिजीतच्या लाईव्ह शोमध्ये लाखोच्या संख्येनं प्रेक्षक हजर असतात. दरम्यान, त्याच्या लाईव्ह शोला जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

कोलकातामध्ये जो अरिजीतचा कॉन्सर्ट होणार होता, तो रद्द करण्यात आला आहे. हा कॉन्सर्ट इको पार्क येथे होणारा हा कॉन्सर्ट काही राजकीय कारणांमुळे रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. अरिजीतला त्याच्या ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ या गाण्यामुळे त्याला मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. या गाण्यामुळे त्याचा कोलकाता येथे होणारा एक कॉन्सर्ट रद्द करण्यात आला, असं म्हटलं जात होतं. पण याची दुसरी बाजू आता समोर आली आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु असणाऱ्या कोलकातामधील इको पार्कमध्ये त्याचा हा लाइव्ह कॉन्सर्ट होणार होता. या कॉन्सर्टसाठी अरिजीतनं बऱ्याच काळापासून तयारी सुरू केली होती. पण आता तो कॉन्सर्ट रद्द झाल्यानं त्याच्या  चाहत्यांची निराशा झाली आहे. अरिजीतचा हा कॉन्सर्ट रद्द होण्यामागे राजकीय कारणं असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्यावर हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या एका वृत्तानुसार हे कारण नसल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर अरिजीतनं ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ हे गाणं गायलं होतं. तर अरिजीतचा कॉन्सर्ट रद्द होण्यामागे हेच कारण असल्याचं म्हटलं जातं आहे. दरम्यान, बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी या गोष्टीला चूकीचं म्हटले आहे. त्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की “जी- 20 बैठक त्या पार्कच्या समोरच्या हॉलमध्ये होणार असल्याने या कॉन्सर्टला परवानगी देण्यात आली नाही. कॉन्सर्टच्या वेळी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक गर्दी करतील आणि त्या गर्दीला नियंत्रणात ठेवणं कठीण जाईल. त्यामुळे हा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे.”

हेही वाचा : Dipika Chikhlia : तुम्ही असा घाणेरडा डान्स का करताय? ‘रामायण’ फेम अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

याशिवाय गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण हे त्यांच्या पठाण या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या चित्रपटात अरिजीतचही एक गाणं आहे. ‘झूम जो पठाण’ या गाण्यात देखील शाहरुख आणि दीपिका दिसत आहेत. ‘झूमे जो पठाण’ हे गाणं बॉलिवूडचा लोकप्रिय प्लेबॅक सिंगर अरिजीत सिंगनं गायलं आहे. 

अरिजीत सिंगनं गायलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अरिजीतनं शाहरुखसाठी गायलेलं हे पहिलं गाणं नाही तर या आधी देखील अनेक गाणी गायली आहेत. ‘दिलवाले’ या चित्रपटातील ‘गेरुआ’ आणि ‘जब हॅरी मेट सेजल’मधील ‘हवाएं’ शाहरुखची ही गाणी अरिजीतनं गायली होती. इतकंच काय तर अरिजीतनं गायलेली ही दोन्ही गाणी हिट ठरली होती. त्यामुळे आता ‘झूमे जो पठाण’ हे गाण देखील हिट ठरेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *