Headlines

रणबीर आलियाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; कुटुंबीयांनीच दिली मोठी माहिती 

[ad_1]

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बी-टाऊनमधील सर्वात आवडतं कपल आहे. अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये ही जोडी स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटात दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी दोघंही नुकतेच वाराणसीत पोहचले होते. सध्या दोघंही त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहेत. याचबोरबर या कपलच्या पर्सनल लाईफबद्दलही अंदाज लावले जात आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे कपल एप्रिल 2022 मध्ये लग्न करणार आहेत आणि त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.

एका वृत्तानुसार, रणबीरची आत्या रीमा जैन यांनी लग्नासाठी सहमती दर्शवली आणि सांगितलं की, ”दोघंही लग्न करणार आहेत. मात्र मी ते कधी लग्न करणार आहेत याबद्दल काहीही सांगू शकत नाही. मला अजून तरी याबद्दल काही माहित नाही,ते लग्न करतील, पण मला माहित नाही की कधी. ते ठरवतील आणि मग तुम्हा सगळ्यांना कळेलच.”

रीमा जैन पुढे म्हणाल्या, ”आम्ही अद्याप कोणतीही विशेष तयारी केलेली नाही. तर इतक्या लवकर लग्न कसं होईल. हे जर खरच खरे असेल तर माझ्यासाठीही धक्कादायक असेल. लग्न नक्की होईल. पण कधी होईल हे मला माहीत नाही. रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. या कपलने अद्याप याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आलिया आणि रणबीर दोघांकडेही अनेक चित्रपटांचं लाइनअप आहे. नुकताच आलियाचा ‘RRR’ चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच ती ‘रॉकी और रानी की लव्ह स्टोरी’, ‘डार्लिंग्स’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘जी ले जरा’ मध्ये दिसणार आहे. रणबीरकडे ‘ब्रह्मास्त्र’, ‘शमशेरा’, ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘लव रंजन’ असे अनेक चित्रपट आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *