Headlines

Ram Mandir Ayodhya : चार्टर्ड प्लेनने अभिताभ बच्चन आणि माधूरी दीक्षित पोहोचणार अयोध्येला

[ad_1]

Ram Mandir Ayodhya : सध्या अयोध्यामध्ये राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असताना अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य सोहळ्याला हजेरी लावताना दिसत आहे. या सोबळ्याला केवळ एक दिवस उरला असताना अनेकांचं लक्ष या भव्यदव्य सोहळ्याकडे आहे. अयोध्येत रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांची संख्या सुमारे ६०० वर पोहोचली आहे. आता या सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी आपले बॉलिवूड सेलिब्रिटी कसे मागे राहतील, नुकतेच मेगास्टार अमिताभ बच्चन आणि चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित खासगी चार्टर्ड विमानाने थेट अयोध्येत पोहोचल्याची बातमी समोर येत आहे. 

शुक्रवारी या व्हीआयपी पाहुण्यांची संख्या जवळपास ५०६ होती, मात्र आता या पाहुण्यांची संख्या 600 वर गेली आहे. यामध्ये जवळपास ती राज्याचे पाहुणे अयोध्येत पोहचणार आहेत. इतर लखनौला पोहोचल्याची माहिती आहे. संपूर्ण प्रशासन अयोध्या आणि लखनौमध्ये बंदोबस्तात गुंतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांच्या प्रायव्हेट चार्टर्ड प्लेनने अयोध्येत पोहोचणार आहेत. भगवान श्री रामाच्या अभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या सुमारे 600 लोक अयोध्येत पोहोचले आहेत. एवढेच नाही तर अयोध्या आणि लखनऊमधील पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.
 
 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सुरू झाला आहे, आता राम अयोध्येला परतण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. रविवार 21 जानेवारी रोजी प्रस्थापित देवतांची दैनंदिन पूजा, हवन, पारायण इत्यादी, पहाटे मध्‍वधिवास, 114 कलशातील विविध औषधी पाण्याने मूर्तीचे स्नान, महापूजा, उत्सव, मूर्तीच्या महालाची प्रदक्षिणा, शय्याधिवास, तत्‍लान्‍या, महान्‍या इ. ., शांत-पोषक – अघोर. होम, व्याहती होम, रात्रीची जागर, संध्याकाळची पूजा आणि आरती होईल. संपुर्ण देशाचं लक्ष या भव्यदिव्य सोहळ्याकडे आहे. 

अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील 900 VIP आणि 60 VVIP उपस्थित राहणार आहेत. VVIP ची 60 चार्टर्ड विमाने अयोध्येच्या नवीन विमानतळावर उतरणार आहेत. व्हीव्हीआयपी येथून बाहेर पडल्यानंतर, विमाने इतर विमानतळांवर 1000 किलोमीटरच्या परिसरात पार्क केली जातील, ज्यामध्ये कानपूर विमानतळाचा समावेश आहे.. कारण अयोध्येत फक्त 8 विमाने पार्क करता येतील.

यामध्ये टाटा-बिर्ला, रिलायन्स ग्रुपचे अंबानी कुटुंब, अग्रवाल ग्रुपचे अध्यक्ष, दालमिया ग्रुप, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, माजी सीएम शिवराज सिंह चौहान आणि डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. याशिवाय केपी एंटरप्रायझेस, ईएचए एव्हिएशन, आंतरराष्ट्रीय पाहुणे, एरोट्रान्स एव्हिएशनचे मालक यांची विमाने बाबतपूर विमानतळावर उतरतील. अयोध्या विमानतळावर पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही, त्यामुळे वाराणसी विमानतळावर 13 विमाने पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *