Headlines

Rakhi Swant च्या हाती लागली पती आदिल खान च्या पहिल्या लग्नाची पत्रिका!

[ad_1]

Rakhi Sawant Husband Adil Khan Arrest: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने (Rakhi Sawant) तिचा पती आदिल खान (Adil khan) दुरानीवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आदिल खान पोलिसांच्या ताब्यात असून त्याची जामिन फेटाळल्याचा दावा राखीने केला आहे. राखी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, त्याला जामिन मिळाला नाही. त्याला थेट कस्टडी, तुरुंगात पाठवले आहे. वकील आणि पोलिस त्यांचे काम करत आहे. मला न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, 

राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्रानी यांच्यामध्ये असलेला वाद प्रचंड वाढला आहे. त्या दोघांमध्ये वादाची सुरुवात ही राखीच्या आईच्या मृत्युनंतर झाली होती. आता दोघांमधील नाते बिघडले असून राखीने आदिलवर मारहाणीचा आरोप केला आहे. शिवाय त्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी आदिलविरोधात एफआयआर दाखल केले. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत आदिल दुर्रानीला ताब्यात घेतले होते. त्याला कोर्टात हजर केलं असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, राखी सावंतची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

आदिलवर लावण्यात आली आहेत ही कलमं  

राखीनं काही दिवसांपूर्वी मारहान केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की आदिलनं तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. आदिलवर आता 406-420 व्यतिरिक्त  506, 513 आणि 323 अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राखीनं आदिलवर सुटका मिळणार नाही कठीण झाले आहे. आदिलची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आदिल तुरुंगात गेल्यानंतर राखी सावंतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली व्यथा मांडली होती.

हेही वाचा : ‘मला याची…’, Kissing Scene देण्याविषयी ‘हे’ काय बोलून गेला Lalit Prabhakar

राखीनं आदिलवर मारहाण, पैसे चोरल्याचा आरोप त्यानंतर रात्री त्याच्यासोबत डिनर डेटला गेली होती. यावेळी त्यांनी एकमेकांना घासही भरवला. या डिनर डेटचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता काय तर राखीने आदिलवर गंभीर आरोप केले. आदिलने राखीला मारहाण केली आणि तिचे दागिने आणि पैसे घेतल्याचा आरोप तिने केला.आदिल खान दुर्रानी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु आहे, असा आरोप करणारा राखी सावंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची चर्चा सुरु असताना अदिलच्या गर्लफ्रेंडचा फोटोही समोर आला.

राखी सावंत तिच्या वकिलाला भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटबाहेर दिसली. यावेळी पापाराझीने तिला विचारले की ती आनंदी दिसते. राखी यावर म्हणाली की ती आनंदी नाही, उलट तिला आदिलबद्दल काहीतरी कळले आहे. आदिलच्या पहिल्या लग्नाची पत्रिका, घटस्फोट आणि लग्नाची कागदपत्रे सापडली आहेत. या पुराव्यांमुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *