Headlines

रजनीकांत यांच्या ‘जेलर’नं बॉक्स ऑफिसवर 4 दिवसात केली 300 कोटींची कमाई!

[ad_1]

Jailer Box Office Collection Day 4: दाक्षिणात्य अभिनेता आणि थलैवा रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता चार दिवस झाले आहेत. तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहेत. चित्रपटानं पहिल्या दिवशी गुरुवारी बंपर ओपनिंग केली. चार दिवसात जेलरनं वर्ल्ड वाइड 300 कोटींचा आकडा पार केला आहे. पण जर रजनीकांत यांना पाहता या चित्रपटानं कमी कमाई केली असे म्हटले जात आहे. 

रजनीकांत यांच्या या चित्रपटाच्या कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर sacnilk नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, ‘गदर 2’ प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. पण दुसऱ्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई केली नाही. तर काल म्हणजेच रविवारी चित्रपटानं 38 कोटींची कमाई केली. चित्रपटाची ही कमाई चारही भाषा मिळून म्हणजेत तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी या भाषा मिळून. 

एकूण कशी आणि किती केली कमाई?
जेलर चित्रपटानं पहिल्या दिवशी 48.35 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 25.75 तिसऱ्या दिवशी 5.95 तर चौथ्या दिवशी 38 कोटींची कमाई केली आहे. हिंदी विषयी बोलायचं झालं तर चित्रपटानं पहिल्या दिवशी 35 लाख, दुसऱ्या दिवशी 15 लाख, तिसऱ्या दिवशी 25 लाख झाली. सगळ्यात जास्त कमाई ही तामिळ भाषेतील चित्रपटात झाली. चित्रपटानं चार दिवसात 146.40 कोटींची कमाई केली.  

वर्ल्ड वाईट कमाई बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटानं तीन दिवसात 222.10 कोटींची कमाई केली. तीन दिवसांत चित्रपटानं परदेशत 95 कोटींची कमाई केली. तर तीन दिवसात 127.10 कोटींची कमाई ही फक्त भारतात झाली आहे. 

हेही वाचा : राष्ट्रपती मुर्मू यांनी खरंच ‘गदर 2’ पाहिला का? PIB नं सांगितलं सत्य

रजनीकांत यांच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार यांनी केलं आहे. त्यांच्या या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार हे कलाकार आहेत. तर मोहनलाल यांची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. रजनीकांत यांची क्रेझ पाहता अनेक ऑफिसेसमध्ये कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली होती. तर काही ऑफिसमध्ये चित्रपटाची तिकिटे देखील देण्यात आली आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *