Headlines

raj thackeray told about har har mahadev on special screenings spb 94

[ad_1]

अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा विशेष शो आज ओअर परळ येथील पीव्हीआर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील उपस्थित होते. चित्रपट बघितल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी चित्रपटाबाबत त्यांची भावना व्यक्त केली.

हेही वाचा – राज ठाकरेंच्या दीपोत्सवाची सचिन पिळगावकरांना भूरळ, म्हणाले “आमच्या मित्रामुळे…”

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

“चित्रपट माध्यम मला कळतं आणि समजतं. हा चित्रपट पाहिल्यानंतर मी एवढं सांगेन की, मेहनत काय असते हे बघायचं असेल, तर हा चित्रपट बघावा. खूप वर्षांनी उत्तम संवाद असलेला चित्रपट येतो आहे. आनंद चित्रपट बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. सहसा माझ्या डोळ्यात पाणी येत नाही, पण हा चित्रपट बघताना असे काही प्रसंग होते, जेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी चित्रपटाबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा – खास ‘या’ व्यक्तीला भेटण्यासाठी प्राजक्ता माळीची राज ठाकरेंच्या दीपोत्सव कार्यक्रमात हजेरी; पाहा Photos

“’हर हर महादेव’ या चित्रपटातील सर्वच कलाकरांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे मराहाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हा चित्रपट बघितला हवा. माझा या चित्रपटाला आवाज आहे, हा दुय्यम भाग आहे. परंतु ऐतिहासिक चित्रपट कसा असतो, याचा उत्तम नुमना म्हणजे हा चित्रपट आहे. प्रत्येकाने तो बघितलाच पाहिजे”, अशी माझी विनंती आहे, असेही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *