Headlines

Raj Thackeray Konkan Tour : कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार | Raj Thackeray will start his Konkan tour with a visit to Ambabai of Kolhapur msr 87

[ad_1]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन राज ठाकरे हे आपल्या कोकण दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. राज ठाकरेयांनी स्वत: आज प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

मुंबईत मनेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आज राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विविध मुद्य्यांवर प्रतिक्रिया दिली.

हेही पाहा – महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केलं लक्ष्य, म्हणाले “वाईट याचंच वाटतं की…”

राज ठाकरे म्हणाले, “आजची बैठक जी बोलावलेली आहे, ती पक्षाच्या ज्या इतर संघटना आहेत. या संघटनांच्या संदर्भात गेली अनेक वर्षे जे काम करत आहेत. त्यांच्या अडचणी असतील तर त्या समजून घेणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे व त्यावर काही तोडगा काढणे यासाठी आहे. तसं म्हटलं तर ही अराजकीय आहे आणि संघटनात्मक असल्याने यावर तसं बोलण्यासारखं आता सध्यातरी काही नाही. ”

हेही पाहा – PHOTOS: कोसळलेला पूल, अडकलेले लोक आणि मदतीसाठी आरडाओरड; गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेची डोळे पाणवणारी छायाचित्रे

याशिवाय, “साधारणपणे २७ नोव्हेंबरला पक्षाच्या मुंबईच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावमध्ये नेस्को येथे होणार आहे. हा मेळावा झाला की २८ किंवा २९ नोव्हेंबरला मी कोकण दौऱ्यावर निघणार आहे. पहिले मी कोल्हापूरला जाणार तिथे देवीचं दर्शन घेऊन तिथून मी कोकण दौऱ्यावर निघणार आहे.” असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

“वाईट या गोष्टीचं वाटतंय की जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय; मला वाटतं पंतप्रधानांनी…” ; राज ठाकरेंचं विधान!

यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. “प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला, गुजरातमध्ये गेला. माझी मागची सर्व भाषणे तुम्ही जर काढून बघितली तर पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान असलं पाहिजे. उद्या जर महराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता असं समजा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो शेवटी गुजरातला जातोय.” असं राज ठाकरेंनी बोलून दाखवलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *