Headlines

Raj thackeray interview with subodh bhave on har har mahadev movie spb 94

[ad_1]

‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्ताने आज अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी या चित्रपटाला दिलेला आवाज, रेकॉर्डींच्या वेळेचे त्यांचे अनुभव यासह अनेक मुद्यांवर दिलखुलास गप्पा मारल्या. दरम्यान, चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकही तुमच्या आवाजाचे कौतुक करतील, असे सुबोध भावेंनी म्हणताच राज ठाकरेंनी स्वत:वरच मिश्कील टीप्पणी केली.

नेमकं काय घडलं?

“हर हर महादेव या चित्रपटासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी सुबोध भावे याने राज ठाकरे यांच्या आवाजाचे कौतुक केल्यानंतर प्रेक्षकांनाही हा तुमचा आवाज आणि चित्रपट आवडेल, असे म्हणताच, लोक मला हेच करायला लावतील”, अशी मिश्कील टीप्पणी त्यांनी स्वत:वरच केली. यावेळी उपस्थितामध्ये हशा पिकला होता.

हेही वाचा – “…तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सर्व चित्रपटात व्हॉईस ओव्हर द्यायला लावला”, राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

“मला ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला आवाज देण्याची संधी दिली, त्या बद्दल मी निर्मात्यांचे आभार मानतो. माझ्या वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी संगीतात काहीतरी करेन, असे त्यांना वाटायचे. त्यांनी माझ्याकडून अनेक वाद्येही वाजवून घेण्याचा प्रयत्न केला”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – तुमचं खरं नाव स्वरराज, मग आता केवळ राज नाव का? सुबोध भावेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले…

“मी स्वरराज नावाने व्यंगचित्र करायचो. मात्र मला एके दिवशी ‘मी बाळ ठाकरे नावाने सुरुवात केली, तू राज ठाकरेने सुरुवात करायची,’ असे मला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना माझे दुसरे बारसे झाले”, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *