Headlines

राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केलेल्या चित्रपटाला संभाजीराजेंचा विरोध, म्हणाले, “त्यांना माझी…” | Sambhajiraje Chhatrapati comment on Raj Thackeray Eknath Shinde over controversial historical movies

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या चित्रपटाचे कौतूक केले त्या चित्रपटावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र आक्षेप घेतले आहेत. तसेच चित्रपट निर्मात्यांना ‘गाठ माझ्याशी आहे’ असं म्हणत जाहीर इशारा दिला आहे. संभाजीराजे छत्रपती रविवारी (६ नोव्हेंबर) पुण्यात बोलत होते.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मला जे बोलायचं आहे ते मी बोललो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना माझी पत्रकार परिषद दाखवा. त्यांना माझ्या भूमिकेत काही चुकीचं वाटत असेल तर त्यांनी सांगावं.”

“राज ठाकरेंनी चित्रपटाचं कौतुक केलं, त्याविषयी त्यांना विचारा”

“माझी भूमिका ही माझी भूमिका आहे. त्यांचे काही आक्षेप असतील तर त्यांना माध्यमांनी विचारावं की मी काही चुकीचं बोललो का? राज ठाकरेंनी या चित्रपटाचं कौतुक केलं. त्याविषयी माध्यमांनी त्यांना विचारावं. लोकही त्यांना याबाबत विचारतील,” असं मत संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केलं.

“त्यावेळी आणखी कोण आडवं येतं ते बघू”

“मी शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या घराण्याची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. यात एकही टक्का बदल होणार नाही.उद्या परत असा चित्रपट काढला, तर मी आडवा येईल. त्यावेळी आणखी कोण आडवं येतं ते बघू,” असा थेट इशारा संभाजीराजेंनी दिला.

व्हिडीओ पाहा :

चित्रपटाला राज ठाकरेंचा व्हॉईस ओव्हर, संभाजीराजे म्हणाले…

चित्रपटाला राज ठाकरेंचा व्हॉईस ओव्हर आहे याबाबत विचारलं असता संभाजीराजे म्हणाले, “पत्रकारांनी मला माझ्याविषयीचे प्रश्न विचारावेत. मी त्यांची उत्तरं द्यायची का? मी त्यांची उत्तरं देणार नाही. मला माझ्याविषयी विचारा.”

हेही वाचा : ‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर संभाजीराजे संतापले, इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप

“एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना इथं बोलवू आणि…”

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे त्या चित्रपटाच्या लाँचिंगच्या वेळी स्टेजवर होते. यावर विचारलं असता संभाजीराजे म्हणाले, “मग आपण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना इथं बोलवू आणि एकत्रित पत्रकार परिषद घेऊ. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार नाही. त्याची काहीही गरज नाही. त्यांच्याकडे सेन्सॉर बोर्ड आहे. त्यांनी तिथं इतिहासाची समिती नेमावी.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *