Headlines

rahul gandhi bharat jodo yatra maharashtra timetable spb 94

[ad_1]

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ पदयात्रा काढण्यात आली आहे. कन्याकुमारी येथून या पदयात्रेला सुरूवात झाली असून ही पदयात्रा एकूण १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. दरम्यान, ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असून राज्यात ती ३८२ किमीचा प्रवास करणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – अवघड राज्यांमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो’चा प्रवास

हेही वाचा – शिवाजी महाराजांपेक्षा मोठं कोण? शरद पवारांचा छत्रपतींसोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल; रोहित पवारांनी मागितली माफी

असे असेल महाराष्ट्राचे वेळापत्रक

‘भारत जोडो’ पदयात्रेचे ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन होईल. ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान ही पदयात्रा नांदेडमध्ये असेल. यादरम्यान चार ठिकाणी या यात्रेचे मुक्काम असेल. ११ ते १५ नोव्हेंबर ही यात्रेचे हिंगोतील आगमन होईल. तर १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान वाशिम, १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अकोला आणि १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाण्यातून ही यात्रा जाणार आहे. तसेच नांदेड आणि शेगाव येथे राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत.

हेही वाचा – “त्यांचा बलात्काऱ्यांना पाठिंबा”, बिल्किस बानो प्रकरणावरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल; म्हणाले…

उद्धव ठाकर, शरद पवारांनाही निमंत्रण

राहुल गांधी यांची ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपाची विचारधारा मान्य नसणारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी देशाची अखंडता अबाधित राहावी, यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील ‘भारत जोडो’ पदयात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना या पदयात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *