Headlines

पुणे : मध्यरात्री रस्त्यावर रडत बसलेल्या तरुणीला पाहिलं अन्… ; वसंत मोरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग | young woman crying on road mns leader vasant help her to reach home pune katraj rmm 97

[ad_1]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी सोमवारी मध्यरात्री रस्त्यावर रडत बसलेल्या एका तरुणीला सुखरूप घरी पोहोचवलं आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट करत संबंधित घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून वसंत मोरे आपल्या घरी चालले होते. यावेळी पुण्यातील कात्रज चौकातील रस्त्यावर एक तरुणी रडत असताना त्यांना दिसली. या तरुणीची विचारपूस करून वसंत मोरेंनी तिला सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. याबाबतचा प्रसंग वसंत मोरेंनी फेसबूक पोस्टद्वारे सांगितला आहे.

वसंत मोरेंनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं की, सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वाढदिवसाचा कार्यक्रम पार पाडून आणि मी घरी जात होतो. यावेळी कात्रज चौकातील पदपथवर एक तरुणी मोठ्याने रडत बसली होती. तिच्या राहणीमानावावरून ती मोठ्या घरातील वाटत होती. ती रडत असताना तिच्या आजूबाजूला ४ ते ५ रिक्षावाले उभे होते. पण तिला कोणीच तिच्या रडण्याचे कारण विचारत नव्हतं. दरम्यान, मी तेथून जात असताना गाडीच्या प्रकाशात ती मुलगी मलाही दिसली. मी गाडी थांबवून तिला रडण्याचं कारण विचारलं. पण तिने आणखी मोठ्याने रडायला सुरुवात केली.

दरम्यान, तिथे एक तरुण आला, तो रडणाऱ्या तरुणीला ओळखतो, असं त्याने सांगितलं. पण मी तरुणीकडून याची खात्री करून घेतली. एवढंच नव्हे तर मी तरुणीच्या वडिलांना ४ वेळा फोन लावला, पण त्यांनी फोन उचलला नाही. शेवटी तरुणीच्या आईला फोन केला. यावेळी संबंधित तरुणी कामावर गेली असल्याचं तिच्या आईकडून कळालं. पण संबंधित तरुणी कामावर न जाता इकडे रडत बसली आहे, अशी माहिती मी तरुणीच्या आईला दिली.

हेही वाचा- झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी जोडप्यानं दिला दोन महिलांचा नरबळी; आधी गळा चिरला आणि मग…

यानंतर तरुणीला ओळखणाऱ्या तरुणाची संपूर्ण चौकशी करून तिला त्याच्या ताब्यात दिलं. शिवाय त्याच्या गाडीचा फोटो काढला आणि त्याचा फोन नंबरही घेतला. तसेच मुलीला सुखरुप घरी पोहोचवलंस की फोन अथवा मेसेज कर, असा दमही भरला. यानंतर संबंधित तरुणाने रडणाऱ्या तरुणीला सुखरूप घरी पोहोचवलं आणि अपेक्षेप्रमाणे याबाबत मेसेज करून माहिती दिली, असा प्रसंग वसंत मोरेंनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे सांगितला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *