Headlines

Priyanka Priyanka Chopraच्या लेकीची झलक दाखवणार होती पण…

[ad_1]

Priyanka Chopra Daughter: बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने लेकीचा म्हणजे मालतीचा चेहरा सगळ्यांपासून लपवून ठेवला आहे. मात्र प्रियांका सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती वरच्या वरच सोशल मीडियावर कधी फोटो तर कधी व्हिडीओ शेअर करत असते. मालतीचा पण फोटो किंवा व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र त्यात ती मालतीचा चेहरा कधी दिसू देत नाही. 

शूटिंग नसल्यास प्रियांका आपल्या पूर्ण वेळ मालतीसोबत घालवते. शनिवारी प्रियांकाने एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या क्यूट व्हिडीओमध्ये प्रियांका आपल्या लेकीला सोनम कपूर-अभिषेक बच्चन यांच्या ‘दिल्ली 6’ चित्रपटातील ‘ससुराल गेंदा फूल’ वर डान्स करताना दिसत आहे. (trending news entertainment gossips priyanka chopra her daughter glimpse dancing video on sasural genda phool song on social media) 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियांका मालतीला एका हाताने पकडून गाण्यावर डान्स करत दिसत आहे. प्रियांकाने पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘Saturday mornings be like…’ या व्हिडिओवर अभिनेता फरहान अख्तर आणि दिया मिर्झा यांनी कमेंट केली आहे. तर चाहत्यांनी लिहिलंय की, ‘इंटरनेटवरील आजची सर्वात सुंदर पोस्ट.’ दुसर्‍या यूजर्सने म्हटलंय की, ‘ती (मालती) ज्या प्रकारे संगीताचा आनंद घेत आहे ते आश्चर्यकारक आहे.’ आणखी एका चाहत्याने म्हटलं आहे की, ‘ती सर्वात क्यूट आहे. बेबी गर्ल. प्रियांकाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Priyanka Priyanka Chopraच्या लेकीची झलक दाखवणार होती पण या व्हिडीओमध्ये तिने चेहरा दिसू नये याची खबरदारी घेतली आहे. प्रियांकाचे काही हॉलिवूड प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. त्याचवेळी प्रियांका फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *