Headlines

Prithvi Shaw Triple Century : गेल्या 6 वर्षांत रणजीत जे झालं नाही, ते ‘या’ पठ्ठ्याने करून दाखवलं

[ad_1]

Prithvi Shaw Triple Century : रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2023 ) मुंबई आणि आसाम यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) शानदार पुन्हा एकदा तडाख्या फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. पृथ्वी शॉने या मॅचमध्ये त्रिशतक झळकवून फर्स्ट क्लास क्रिकेटमधील मोठी धावसंख्या केली आहे. मागच्या 6 वर्षात रणजी ट्रॉफी ( Ranji Trophy) स्पर्धेत जे झालं नव्हतं, ती कामगिरी पृथ्वी शॉ ने करून दाखवली आहे.  2017 नंतर देशांतर्गत क्रिकेटमधील या मोठ्या फॉर्मेचमध्ये त्रिशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे, पृथ्वी शॉ ची इनिंग जशी पुढे जातेय, तसा त्याचा स्ट्राइक रेट ही वाढत जातोय. 

रणजी ट्रॉफीत ठोकले त्रिशतक 

दरम्यान, आसमच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईच्या (Mumbai Team) संघाला प्रथम फलंदाजी घेतली. पृथ्वी शॉ आणि मुशीर खान या सलामीवारांनी शानदार सुरूवात करून आसामवर दबाव  टाकला. मात्र मुशीर खान त्याच्या अर्धशतराला मुकला आणि 42 धावांवर तंबूत परतला. पण पृथ्वीने 326 चेंडूचा सामना करून शानदार त्रिशतक झळकावले. त्याला कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करून साथ दिली. दरम्यान मुंबईच्या संघाची धावसंख्या 112 षटकांपर्यत 2 बाद 515 एवढी झाली आहे. पृथ्वी 341 चेंडूत 316 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. या मध्ये विशेष बाब म्हणजे त्रिशतकी खेळीत एकूण 43 चौकार आणि 2 षटकार मारले. 

पृथ्वी शॉ ची धडाकेबाज खेळी 

रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेत पृथ्वी शॉने 383 चेंडूत 379 धावा केल्या आहेत.  या खेळीत सलामीवीराने 4 षटकार आणि 49 चौकार लगावले आहेत. तसेच स्ट्राईक रेटही 98.96 होता. खेळाच्या पहिल्या दिवशी तो 240 धावांवर नाबाद झाला. पृथ्वी शॉ मैदानात आणखीन टिकून राहिला असता तर 400 धावांचा विक्रमही केला असता. सध्या मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे सामन्यात शतक झळकावत आहे. 

पृथ्वी शॉ चे आंतरराष्ट्रीय करिअर

पृथ्वी शॉने भारतासाठी 5 कसोटी सामने, 6 एकदिवसीय आणि 1 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. कसोटी सामन्यांच्या 9 डावात त्याने 42.37 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या. तसेच एकमेव T20 सामन्यात त्याने फक्त एक चेंडू खेळला, ज्यामध्ये तो खाते उघडू शकला नाही. 

रणजी ट्रॉफीमधील सर्वोच्च धावसंख्या

1. बीबी निंबाळकर – 443* धावा, महाराष्ट्र – काठियावाड विरुद्ध (1948)
2. पृथ्वी शॉ – 379 धावा, मुंबई विरुद्ध – आसाम  (2023)
3. संजय मांजरेकर – 377 धावा, बॉम्बे – विरुद्ध हैदराबाद (1991)
4. एमव्ही श्रीधर – 366 धावा, हैदराबाद विरुद्ध – आंध्र  (1994)
5. विजय मर्चंट – 359* धावा, बॉम्बे विरुद्ध – महाराष्ट्र (1943)
6. सुमित गोहेल – 359* धावा, गुजरात विरुद्ध – ओडिशा  (2016) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *