Headlines

प्रेमाला सीमा नसतात; Virat Kohli साठी ‘तिनं’ उचललं मोठं पाऊल, पाहून अनुष्कालाही बसेल धक्का

[ad_1]

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळल्यानंतर आता संघात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विराट कोहली यानं अनेक क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. काहींच्या मनात त्यानं असं स्थान मिळवलं की, त्याच्यावर अनेकांचाच जीव जडला. विराटच्या प्रेमात असणाऱ्यांमध्ये तरुणींचा आकडा तुलनेनं मोठा. 

Female Fans चं त्याच्यावर असणारं प्रेम एशिया कप 2022 (Asia Cup 2022)मध्येही पाहायला मिळालं. नुकत्याच पार पडलेल्या भारत- पाकिस्तान (Ind Vs Pak Match) सामन्यादरम्यान, विराटनंही आपल्यावर प्रेम करणाऱ्या या व्यक्तीला पाहिलं असावं. (Asia Cup 2022 Virat Kohli Pakistani Fan photo Viral)

भारतीय क्रिकेट संघ (Team India) या सामन्यात पराभूत झाला असला आणि पाकिस्तानच्या संघानं सामना खिशात टाकला असला, तरीही एक अशी व्यक्ती होती जिनं तिच्या ‘विराट’प्रेमानं सर्वांनाच थक्क केलं होतं. 

दुबई इंटरनेशनल स्टेडियममध्ये (Dubai International stadium) विराटच्या एका पाकिस्तानी चाहतीवर अनेकांच्याच नजरा खिळल्या. आयएएस अधिकारी अवनीश शरण (IAS Awanish Sharan) यांनीही तिचं कौतुक केलं. 

‘मी सामन्यात फक्त कोहलीसाठी आलेय….’, असं पोस्टर हातात धरलेल्या या चाहतीचा फोटो शरण यांनी ट्विटरवर शेअर केला. आतापर्यंत त्यांच्या या ट्विटला अनेक लाईक्स् आणि रिट्विट मिळाले आहेत. विराटवर प्रेम करणारी ही चाहती नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे.

मुख्य म्हणजे प्रेमाच्या बळावर शत्रुत्वं संपवता येतं, खेळात खेळाडू आणि प्रतिस्पर्धी म्हणून खेळा, सकारात्मक विचारानं खेळा असं म्हणत बऱ्याच युजर्सनी या फोटोवर प्रतिक्रियाही दिल्या. 

विराटच्या या जबरा फॅनचं त्याच्यावर असणारं प्रेम पाहून (Anushka SharaMa) अनुष्काला सुखद धक्का बसेल यात शंका नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *