Headlines

Pradosh Vrat 2023: या वर्षातील पहिला प्रदोष 4 जानेवारीला, ग्रहांच्या स्थितीमुळे चांगला योग; जाणून घ्या पूजाविधी

[ad_1]

Budh Pradosh Vrat: हिंदू धर्मात प्रदोष व्रताचं खास महत्त्व आहे.  प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळलं जातं. वर्षभरात एकूण 24 प्रदोष व्रत येतात.  या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास इच्छित फळ मिळतं अशी मान्यता आहे. वैवाहिक सुख, संततीचे दीर्घायुष्य आणि ग्रह पीडेपासून मुक्ती मिळते. 2023 या वर्षातील पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 4 जानेवारी 2023 रोजी येत आहे. ही तिथी बुधवारी येत असल्याने बुध प्रदोष व्रत आहे. प्रदोष वेळ म्हणजे त्रयोदशीच्या संध्याकाळी सूर्यास्तापासून पुढे 1 तास 12 मिनिटांचा काळ असतो.  

हिंदू पंचांगानुसार, प्रदोष 03 जानेवारी रोजी रात्री 10.01 वाजता सुरू होईल आणि 04 जानेवारी रोजी रात्री 11.50 वाजता संपेल. बुध प्रदोष व्रत 04 जानेवारी 2023 रोजी उदय तिथीनुसार असेल. बुद्ध प्रदोष व्रतासाठी पूजा मुहूर्त संध्याकाळी 05.37 ते 08.21 पर्यंत असेल. या दिवशी दुपारी 12.13 ते 12.57 पर्यंत अभिजीत मुहूर्त आहे. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग दिवसभर राहील. रवि योग संध्याकाळी 06:49 ते दुसऱ्या दिवशी 05 जानेवारी रोजी सकाळी 07:13 पर्यंत सुरू होईल. हा प्रदोष व्रत वृषभ, मिथुन, तूळ आणि मकर राशीसाठी लाभदायी आहे. 

बुध प्रदोष व्रत पूजाविधी

प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर बेलपत्र, अक्षता, दीप, धूप, गंगाजल यांनी शिव पूजा करा. या व्रतादिवशी अन्न ग्रहण वर्ज्य आहे. सुर्यास्तानंतर पुन्हा स्नान करून पांढरी वस्त्र परिधान करावी. उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून कुशाच्या आसनावर बसावं. त्यानंतर भगवान शिवाचा ओम नम: शिवाय मंत्राचा जाप करावा. त्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करावं. 

बातमी वाचा- Rahu Gochar 2023: ‘या’ वर्षात पापग्रह राहु करणार गोचर, या राशींना मिळणार साथ

या दिवशी या बाबी चुकूनही करू नका

या दिवशी काळे कपडे परिधान करू नका. तसेच कोणाचाही अपमान कर नका. त्याचबरोबत शिवलिंगावर हळदी अर्पण करू नका. या दिवशी तामसिक भोजन, मास, दारू इत्यादींचं सेवन करू नका. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *