Headlines

प्रभास अखेर प्रेमात पडलाच? एकही संधी न सोडता चक्क त्याने…

[ad_1]

Prabhas on Kriti Sanon: प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं म्हणतात. मग प्रेम व्यक्त करायची वेळ आली मग ते कुठल्याही पद्धतीनं असो ते काही लपून राहतं नाही. असंच काहीसं प्रभास (Prabhas) या दाक्षिणात्त्य सुपरस्टारसोबत झालं आहे. बाहूबली जेव्हा रिलिज झाला तेव्हा प्रभासला चक्क पाच हजाराच्या वर लग्नाचे प्रस्ताव आले होते. त्यानंतर अनुष्का शेट्टीसोबतच्या आपल्या बेक्रअपमधून बाहेर पडताच आता प्रभास क्रिती सननच्या प्रेमात असल्याचं बोललं जात आहे. (bahubali star prabhas dating kriti senon rumors of adipurush co star)

बॉलिवूड स्टार्स वरुण धवन आणि क्रिती सेनन(Varun Dhawan and Kiri Sanon) यांचा ‘भेडिया’ (Bhediya) हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहे. स्त्री फेम दिग्दर्शक अमर कौशिक (Amar Kaushik) यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनन स्टारर ‘भेडिया’ (Bhediya Movie Trailer) या चित्रपटाचा धनसू ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी चित्रपट हिट आहे, अशा कमेंट्स केल्या. 

या चित्रपटात क्रिती सनन आहे. क्रिती आणि प्रभास आता लवकरच आदिपुरूष (Adipurush) या आपल्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. तेव्हा क्रिती आणि प्रभासच्या  अफेअरच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. हा ट्रेलर पाहून प्रभासही आपली प्रतिक्रिया लपवून ठेऊ शकला नाही. आपल्या या रूमर्ड गर्लफ्रेंडच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना प्रभासनं तिच्या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. 

सुपरस्टार प्रभासने वरुण धवन आणि क्रिती सेनॉनच्या भेडियाचा ट्रेलर पाहिल्यानंतर इंस्टास्टोरीवर टिप्पणी केली आणि लिहिले, ‘ट्रेलर खूपच छान दिसत आहे. संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. ‘वरूण धवन आणि क्रिती सेनन’ प्रभासकडून मिळालेल्या या कौतुकावर अभिनेत्री क्रिती सेननही त्याचे आभार मानल्याशिवाय राहू शकली नाही. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीने लिहिले की, ‘प्रभास तू खूप क्यूट आहेस… धन्यवाद.’ क्रिती सेनॉन आणि प्रभास यांच्यातील या गोंडस संवादाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. 

साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनन लवकरच आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास श्री रामची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

या चित्रपटाच्या शूटिंगनंतर जेव्हा  क्रिती सेननने कॉफी विथ करण 7 (Coffee With Karan) च्या गेम राऊंडदरम्यान प्रभासला पहिल्यांदा कॉल केला होता असे उत्तर दिले तेव्हापासून दोघांच्या लिंकअपच्या अफवा समोर येऊ लागल्या आहेत. मात्र, दोघेही एकमेकांना आपले आपले चांगले मित्र मानतात, असे ते दोघं म्हणतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *