Headlines

अपघातानंतर रंभानं Video शेअर करत सांगितली मुलीची अवस्था, चाहत्यांना म्हणाली…

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रंभाचा (Actress Rambha) नुकताच अपघात झाला होता, ज्यामध्ये तिची मुलगी साशा देखील जखमी झाली होती. रंभा कुटुंबासह कॅनडामध्ये राहते. रंभा ही मुलांसोबत शाळेतून परतत असताना हा अपघात झाला. रंभाची मुलगी साशा हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रंभाने आता साशाची प्रकृती कशी आहे हे सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सांगितले आहे. मुलीची हेल्थ अपडेट देत तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे.

रंभानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत, इतक्या वर्षांनंतरही लोक तिची आठवण करतात. रंभाने 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. तिने सलमान खानसोबत ‘जुडवा’ आणि ‘बंधन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. रंभाने बॉलिवूडशिवाय दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, करिअरच्या शिखरावर पोहोचल्यानंतर रंभानं कॅनेडियन उद्योगपती इंदर कुमार पद्मनाथनशी लग्न केले आणि कॅनडामध्ये स्थायिक झाली.

या व्हिडीओमध्ये रंभा म्हणतेय की, ‘आमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केल्याबद्दल आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल मी माझे सर्व चाहते, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार मानते. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. तुम्ही मला दिलेल्या प्रेमानं आणि पाठिंब्यानं माझं हृदय भरून आलं आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करत राहा. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल माझा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझी मुलं सुरक्षित आहेत. माझी मुलगी साशा ठीक आहे. आम्ही सर्व घरी परतलो आहोत. तुम्हा सर्वांचे आभार. मला हे जाणून खूप आनंद झाला की मी अजूनही तुमच्या आठवणीत आहे.’ (Actress Rambha Gives Health Update After Accident Thanks Fans For Their Support Says Happy You All Remember Me And Love Me) 

20 वर्षांपूर्वी रंभाने जेव्हा बॉलिवूडला अलविदा म्हटलं तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला होता. रंभाने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना चित्रपट का सोडले, असा प्रश्न सर्वांना पडला. रंभाने 2009 मध्ये एका मुलाखतीत चित्रपट सोडण्याचे कारण सांगितले होते. रंभाने सांगितले होते की, तिला बॉलिवूडमध्ये छोट्या-छोट्या भूमिका मिळू लागल्या, ज्यामध्ये तिला वेश्या बनण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर रंभाने चित्रपट सोडून घर सांभाळायला सुरुवात केली आणि तिच्या निर्मितीच्या कामावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *