Headlines

सुकन्या मोनेंनी केलं लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीचं कौतुक, कारण…

[ad_1]

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अरुंधती देशमुख ही भूमिका साकारली आहे. या मालिकेने गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मधुराणीच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. ती तिच्या अभिनयामुळे सतत चर्चेत असते. पण आता मधुराणी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील एका कलाकाराचे कौतुक केले आहे. 

मधुराणीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती आणि चिमुरडी मनू दिसत आहे. त्या दोघीही शूटींगच्या आधी स्क्रिप्ट वाचून डायलॉग पाठ करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने मनूचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे तिच्या या कौतुकावर अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

मधुराणी प्रभुलकर काय म्हणाली?

“मनू , अर्थात जान्हवी…काय सुंदर काम करते . आणि रोज आम्हाला थक्क करत असते. जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी…! ह्या वयात तिचा तिच्या कामावर असणारा फोकस, निष्ठा ,प्रेम patience , लगन हे सगळं अवाक करणारं आहे. मी नुसतं तिला बघूनच तिच्याकडून किती गोष्टी रोज शिकत असते. मला तिचं कौतुक वाटतंच पण खरं सांगायचं तर तिच्याप्रती एक प्रकारचा आदर वाटतो. आणि ते वाटणं अतिशय गोड वाटतं. आई कुठे काय करते या मालिकेच्या टीमचा ती एक भाग असल्याचा आम्हाला खरंच आनंद आहे”, अशी पोस्ट मधुराणी केली आहे. 

 
मधुराणी प्रभुलकरची ही पोस्ट वाचून अभिनेत्री सुकन्या मोने यांनी तिचे कौतुक केले आहे. “कित्ती गोड लिहिलं आहेस ग आणि प्रांजळपणे कबुलीही दिली आहेस…. ह्यासाठी खूप मोठ्ठं मन लागत ह्यासाठी”, अशी प्रतिक्रिया सुकन्या मोने यांनी दिली आहे. मधुराणीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत मनूचे कौतुक करत आहेत. 

Sukanya Mone

दरम्यान मधुराणी प्रभुलकरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेत तिने अरुंधतीची भूमिका साकारली आहे. त्यापूर्वी मधुराणी ही अनेक मालिका आणि चित्रपटातही झळकली. मधुराणीने ‘इंद्रधनुष्य’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘हिच माझी मैत्रीण’, ‘सारेगमापा’, ‘असंभव’ या मालिकेत काम केले आहे. यासोबतच तिने ‘लेकरु’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘सुंदर माझे घर’, ‘मनी मंगळसूत्र’, ‘जिथून पडल्या गाठी’, ‘भाभीपेढीया’, ‘आरहोण’ या चित्रपटातही काम केले आहे. मधुराणी प्रभुलकरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *