Headlines

फोटोत दिसणारी चिमुकली आज कोट्यवधींची मालकीण; अभिनयासोबतच हॉटेलिंग क्षेत्रातही गाजावाजा

[ad_1]

मुंबई : सोशल मीडियावर सहसा असे काही फोटो व्हायरल होतात, ज्यांचा आपल्याशी थेट संबंध नसतो. पण तरीही हे फोटो आपण पाहतो, त्याविषयी विचार करतो. अगदी त्याबाबत सर्चही करतो. सध्या असाच एक फोटो नेटकऱ्यांच्या नजरा वळवत आहे. निमित्त आहे ते म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट. 

तुम्ही हा फोटो पाहिला का? यामध्ये एक चिमुकली मुलगी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वापरले जाणारे कपडे घालून दिसत आहे. बर्फाळ प्रदेशात ती धमाल करताना दिसत आहे. (Childhood photo)

चिमुकलीसोबत एक व्यक्ती दिसत असून, ती व्यक्ती म्हणजे त्या मुलीचे वडील आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या निधनामुळे ती पुरती खचलीही होती. आजच्या घडीला जगातील लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत गणली जाणारी ही मुलगी कोण, तुम्ही ओळखलं का? 

तीसुद्धा एका मुलीची आई आहे. अभिनय क्षेत्रात नाव कमवण्यासोबतच तिनं चित्रपट निर्मिती, हॉटेलिंग अशा क्षेत्रांमध्येही नाव कमवलं. आतातरी लक्षात येतंय का तिचं नाव? 

ही मुलगी आहे, अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka chopra ). वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रियांकानं एक फोटो शेअर केला. सोबत एक गोड कॅप्शन देत तुमची आम्हाला दररोज आठवण येते असंही तिनं इथं लिहिलं. (Priyanka chopra shares childhood photo )

प्रियांकानं शेअर केलेल्या या पोस्टमुळे तिच्या बालपणात डोकावायची संधी सर्व चाहत्यांना मिळाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, सध्या प्रियांका तिच्या कारकिर्दीवर लक्ष देण्यासोबतच आपल्या लेकिवरही तितकंच लक्ष देताना दिसत आहे. 

प्रियांका आणि तिचा पती, निक जोनास सध्या वेगळ्या इनिंगमध्ये व्यग्र असून, हे क्षण ते नव्यानं जगतानाही दिसत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *