Headlines

Pervez Musharraf : परवेज मुशर्रफ यांच बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन, एकट्या राणी मुखर्जीला बोलावलं अन्….

[ad_1]

Pervez Musharraf Bollywood connection : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे दुबईत निधन झाले आहे. या त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच त्यांच्याबाबत अनेक माहिती समोर येत आहे. यातील एक महत्वाची माहिती म्हणजे त्यांचे बॉलिवूडशी (Bollywood) असलेले खास कनेक्शन होते. परवेज मुशर्रफ यांनी अनेक बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींचे भेट घेतली होती. या सर्व भेटी खुप चर्चेत आल्या होत्या. या भेटींमुळे राजकारण देखील तापले होते. नेमके हे अभिनेते आणि अभिनेत्री कोण आहेत? व तो किस्सा काय होता? हे जाणून घेऊयात.  

 

हे ही वाचा : अवनीत कौरचा बोल्ड अंदाज, ग्लॅमरस Photo शेअर

 

राणी मुखर्जीला खास निमंत्रण

परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना 2005 मध्ये भारतात आले होते. यावेळी त्यांनी राणी मुखर्जीला (Rani Mukerji) एका कार्यक्रमाचे खास निमंत्रण पाठवले होते. या भेटीचा किस्सा नंतर राणी मुखर्जीने एका मुलाखतीत सांगितला होता. मला भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांच्या भेटीचा दिवस चांगला आठवतोय 16 एप्रिल 2005. मुशर्रफ यांच्या भारत भेटीदरम्यान, ती एकमेव बॉलिवूड स्टार होती जी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये आयोजित दिनारचा भाग बनली होती, असे राणीने मुलाखतीत सांगितले होते. 

फक्त राणीलाच का बोलावलं? 

परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांची पत्नी बेगम साहबा मुशर्रफ यांची आवडती बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) होती. राणीने ‘वीर जरा’ चित्रपटात साकारलेली पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्याची भूमिका बेगम साहबा मुशर्रफ यांना आवडली होती. म्हणून तिला या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते.

‘माझ्यासाठी हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. अशा कार्यक्रमाचा एक भाग असल्याने मला असे वाटले की होय. हे साध्य करण्यासाठी मी काहीतरी केले आहे. सीमेच्या दोन्ही बाजूंचे आदरणीय लोक अतिशय सुसंस्कृत आणि डाउन टू अर्थ होते. ‘मला वाटते की ‘ब्लॅक’ आणि ‘वीर-झारा’ने सीमेच्या दोन्ही बाजूंवर मोठा प्रभाव टाकला आहे. या पाहुण्यांच्या यादीचा एक भाग असण्याचा मला सन्मान वाटतो, असे राणी या भेटीनंतर मुलाखतीत म्हणाली होती.दरम्यान या भेटीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांनीही तिला पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिल्याचे राणीने (Rani Mukerji) सांगितले होते. 

 

 

संजय दत्त झाला ट्रोल 

2022 मध्ये मुशर्रफसोबतचे (Pervez Musharraf) संजय दत्तचे (Sanjay Dutt) फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या दोघांची भेट दुबईत झाल्याचे वृत्त समोर आले होते. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध खूपच तणावपूर्ण झाले आणि पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर झालेली ही बैठक वादात सापडली होती. त्यामुळे  संजय दत्तला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 

तसेच 2019 मध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या मेहंदी कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसला होते. मिकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडिओमुळे त्याला देखील ट्रोल व्हाव लागलं होतं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *