Headlines

वयाच्या 7 व्या वर्षापासून परफॉर्मर, राहत फतेह अली खान किती कोटींचे मालक?

[ad_1]

Rahat Fateh Ali Khan Net Worth: दारुच्या नशेत नोकराला मारहाण केल्याने पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान वादात सापडले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. सुंदर गाणी गाणारा, विनम्र दिसणारा माणूस वैयक्तिक आयुष्यात असा कसा असू शकतो? असा प्रश्न सोशल मीडियात नेटकरी विचारत आहेत. दरम्यान राहत फतेह अली खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी गायकी कुठे शिकली? त्यांचे नेटवर्थ किती आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

बॉलिवूड आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना त्यांचे काका आणि जगप्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान यांनी शास्त्रीय संगीत आणि कव्वाली शिकवली होती. वयाच्या 7 व्या वर्षापासून ते स्टेजवर परफॉर्म करत आहेत. राहत यांनी 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजा भट्ट दिग्दर्शित ‘पाप’ या चित्रपटातून गायकाने करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी ‘लागी तुझसे मन की लगन’ हे गाणे गायले आहे. या गाण्याने त्यांना भारतात ओळख मिळवून दिली. भारतात येताच राहत यांचे विश्व बदलले आणि ते रातोरात हिट झाले. लोकांना त्याच्या आवाजाची चटक लागली. त्यानंतर प्रत्येक चित्रपटात त्यांची गाणी ऐकू येऊ आली. ते अनेक टेलिव्हिजन शोमध्ये जजची भूमिकेतही दिसले.

25 मिलियन डॉलर्सचे मालक 

राहत भारतात गाण्यासाठी 20 लाखांपेक्षा जास्त पैसे घेतात. एका गाण्यासाठी 20 लाख रुपये घेणारे ते पहिला गायक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राहत हे $25 दशलक्ष किंमतीच्या एकूण मालमत्तेचे मालक असल्याचे सांगितले जाते.राहत फतेह अली खान यांची काही गाणी लोकांच्या ओठांवरुन जात नाहीत. ‘जरूरी था’ आणि ‘तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी’ या गाण्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.

काय आहे प्रकरण?

व्हायरल व्हिडीओमध्ये राहत फतेह अली नोकराचे केस पकडून आणि त्यानंतर हातात चप्पल घेऊन त्याच्या डोक्यावर जोरजोरात मारत असल्याचे दिसत आहे. तर, घाबरून नोकर दूर दूर जातोय. नंतर ते त्याच्याजवळ जातात आणि विचारतात की माझी दारूची बॉटल कुठे आहे? त्यांच्या या प्रश्नावर नोकर शांत राहतो. त्यावर ते पुन्हा एकदा त्याचे केस पकडून मारहाण करण्यास सुरुवात करतात, असे दिसत आहे. दरम्यान नोकराला मारत असताना ते सुद्धा अडखळून खाली पडतात. तेव्हा आजूबाजूला असलेले इतर लोक त्यांना पुन्हा उभं करण्यास मदत करतात. मात्र, त्यानंतरही ते नोकराला मारहाण करण्यास सुरुच ठेवतात. नोकराला प्रश्न विचारतच ते दरवाजाजवळ घेऊन येतात आणि पुन्हा एकदा मारहाण करण्यास सुरुवात करतात. या सगळ्या प्रकारानंतर नोकर शांतच असतो. तो एकाही शब्दाने काही बोलत नाही. या प्रकारानंतर राहत फतेह अली यांनी व्हिडीओ शेअर केला. त्यात पीडित हा त्यांचा शागिर्द असल्याचे समोर आले. राहत फतेह अली आमच्यावर खूप प्रेमदेखील करतात, असेही त्याने सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *