Headlines

बार्शीत रुग्णहक्क मार्गदर्शन शिबीर संपन्न

बार्शी/प्रतिनिधी – 12 ऑगस्ट रोजी सावळे सभागृह, बार्शी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, रुग्ण हक्क परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांच्या हक्कांबाबत जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरमसाठ बिलं, विमा योजना संदर्भातील तक्रारी तसेच रुग्णांचे इतर हक्क यावर रुग्ण हक्क परिषदेचे बाबा चौबे, कल्पना पवार, प्रशांत पवार यांनी मार्गदर्शन केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. विक्रम सावळे यांनी व्यक्तिमत्व विकास आणि वेळेचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बार्शी शहर अध्यक्ष अमोल आंधळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांच्या मदतीकरिता सदैव उपलब्ध असेल असे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष जयंत देशमुख, बार्शी शहर कार्याध्यक्ष ऋषिकेश पाटील, शहर उपाध्यक्ष सुनील मामा कात्रे, युवक चे मंगेश चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *