Headlines

पार्टीत परदेशी तरुणी अन् नशेसाठी चक्क विषारी साप; एल्विश यादवविरोधात FIR

[ad_1]

FIR against Elvish Yadav : ‘बिग बॉस 2’ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव हा सध्या त्याच्या चर्चेत आला आहे. त्याच्या विरोधात नोएडा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र, हे प्रकरण वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राण्यांच्या तस्करीसोबत रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याचा आरोप आहे. त्यासोबत तस्करी करणाऱ्या लोकांशी देखील त्याचे संबंध असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेनवं स्टिंग ऑपरेशन करत नोएडा पोलिसांकडे ही तक्रार केली आहे. त्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर 49 येथे धाड टाकत 5 लोकांना अटक केलं आहे. पोलिसांनी या ठिकाणांहून 5 कोब्रा आणि 1 अजगर जातीचे विषारी साप जप्त केले आहेत. त्यासोबत त्याचं विष देखील तिथे मिळालं आहे. जेव्हा जप्त केलेल्या लोकांची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा की बिग बॉस ओटीटी विजेत एल्विश यादवचं नाव समोर आलं आहे. पोलिसांनी एल्विश विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर खरंच एल्विश हा रेव्ह पार्टी गॅंगचा सदस्य आहे की नाही याचा शोध घेत आहेत. 

दरम्यान, खासदार मेनका गांधी यांच्या पीपल फॉर एनिमल या संस्थेच्या अॅनिमल वेलफेअर ऑफिसरच्या पदावर कार्यरत असलेल्या गौरव गुप्तानं ही तक्रार दाखल केली आहे. त्यानं सांगितलं की युट्यूबर एल्विश यादव हा नोएडाच्या एनसीआर येथे असलेल्या फार्म हाऊसमध्ये आणखी काही युट्यूबर सदस्यांसोबत मिळून स्नेक वेनम आणि जिवंत साप यांचे व्हिडीओ शूट करतो. इतकंच नाही तर रेव्ह प्राटीचे देखील तो आयोजन करतो. ज्यात परदेशातील महिलांना बोलावून सापाचं विष आणि मादक पदार्थांचे सेवन करण्यात यायचे. माहितीनुसार, एका गुप्तहेरानं एल्विशशी संपर्क साधला. त्यावेळी एल्विशनं राहुल नावाच्या एका व्यक्तीचा नंबर दिला आणि त्याचं नाव सांगत त्याच्याशी बोलण्यास सांगितले. गुप्तहेरानं राहुलशी संपर्क साधत पार्टीचे आयोजन करण्यास बोलावले. तर तक्रार दाखल करणाऱ्यानं याची माहिती वन विभागाच्या एका अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दिली. 

काल 2 नोव्हेंबर रोजी सेक्टर-51 मध्ये असलेल्या सेवरोन बॅन्क्वेट हॉलमध्ये आरोपी हा प्रतिबंधित जातींचे साप घेऊन पोहोचला. त्याचवेळी पोलीस आणि वन विभागाची टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी त्वरीत आरोपीला अटक केली. पोलिसांनी पाच जणांना गजाआड केले आहे. हे सगळे जण दिल्लीचे रहिवासी असून राहुल, टीटूनाथ, जयकरण, नारायण आणि रवीनाथ अशी त्यांची नावं आहेत. 

हेही वाचा : उर्फी जावेद पोलिसांच्या ताब्यात? हाताला धरून तिला नेलं आणि…

त्यांच्याकडे 20 मिलीलीटर स्नेक वेनम, पाच कोब्रा, एक अजगर, दोन तोंडी तर एक घोडा पछाड जातीचे साप देखील जप्त केले आहेत. कोतवाली प्रभारी निरीक्षक संदीप चौधरी यांचे म्हणणे आहे की त्या पाचही लोकांना अटक करण्यात आली आहे. एल्विश यादवला धरून हे सहा लोक आहेत आणि काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्विश यादव याचा यात सहभाग होता की नाही त्याचा तपास सुरु होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *