Headlines

देशव्‍यापी फिट इंडिया फ्रीडम रनमध्‍ये सहभागी व्‍हावे- उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील

सोलापूर : नागरिकांना निरोगी आणि तंदुरुस्‍त राहण्‍यासाठी देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये सहभागी होऊन रनला लोक चळवळ बनवा, असे आवाहन उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी शासकीय मैदानावर आयोजित कार्यक्रमात आज येथे केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि वन विभागाच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत युवक व युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या फीट इंडिया फ्रीडम रन उपक्रम 2.0 दौड स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सहायक वनसंरक्षक बाबासाहेब हक्के, 38 एनसीसी बटालियनचे ग्रुप लीडर सतीश कुमार, श्री. प्रेमानंद, वन विभागाच्या अधीक्षक संध्याराणी बंडगर, राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, सेवानिवृत्‍त अधिकारी सतीश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. तारळकर म्हणाले, कोविड-19 नियमांचे काटेकोर पालन करत असतानाही अत्यावश्यक गरज असलेला फिटनेस कायम राखण्यासाठी फिट इंडिया फ्रीडम रन आवश्यक आहे. यामध्‍ये कुठेही आणि केव्‍हाही धावता येते. आपण पळण्यासाठी आवडीचा मार्ग निवडा, आपल्याला अनुकूल अशावेळी धावा, शर्यतही तुमचीच आणि वेगही तुमचाच आहे.

श्री. चव्हाण म्हणाले, फिट इंडिया फ्रीडम रन 2.0, 13 ऑगस्ट 2021 पासून 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे. लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि मैदानी खेळ यासारख्या तंदुरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमात सहभागी व्हावे. “फिटनेस की डोस आधा घंटा रोज” मोहिमेद्वारे नागरिकांनी रोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

यावेळी फीट इंडिया फ्रीडम रन २.० उपक्रम अंतर्गत मुली व मुलांसाठी दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्‍पर्धेचे निरीक्षक म्‍हणून सुभाष माने, रवी राठोड, सुनील जाधव यांनी काम पाहिले. प्रार्थना अकादमी, श्री स्वामी समर्थ अकादमी, रुद्र अकादमी आणि 38 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमास सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, जब्‍बार हन्‍नुरे, राजू कुमार उपस्थित होते.

स्‍पर्धेतील विजेत्‍यांची नावे पुढील प्रमाणे- मुलींचा गट- समृध्‍दी सिध्‍दाराम व्‍हनगुंदे, महादेवी महादेव देवकुळे, चैताली गणेश माने, सपना श्रीमंत कांबळे, सायली संतोष देवकुळे, दिव्‍या कल्‍याणी कुंभार, क्षीतिजा घनश्‍याम किरगत, काजल श्रीमंत राठोड, ऐश्‍वर्या धर्मेंद्र नारायणकर, अदविका प्रवीण देशमुख. मुलांचा गट- गोविंद लालू चव्‍हाण, प्रशांत देवीदास राठोड, गजानन गुरुपाद गौडगांव, किशोर दीपक लामकाने, नागेश विठ्ठल म्‍हेत्रे, ऋतुराज आनंद बडदाळे, सौरभ सोमनाथ चव्‍हाण, विनायक संतोष व्‍हनगुंटी, अनिल नालू पवार, ऋषीकेष पोपट जांभळे. उत्‍तेजनार्थ – रिशान काशीनाथ पटणे, वैभव गंगाधर गिरी, तन्‍मय मयंक बिस्‍ट ई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *