Headlines

स्मार्टफोनमधील Parental Control म्हणजे नेमकं काय? पालकांना कसा होतो याचा फायदा

[ad_1]

नवी दिल्ली :What is Parental Control : मुलांना स्मार्टफोन देताना कोणाचा तरी कॉल येऊ शकतो किंवा महत्त्वाचा डेटा, फाइल्स, फोटो आणि कॉन्टॅक्ट इत्यादी डिलीट होऊ शकतं अशी भीती असते. पण तरीही मुलांनी हट्ट करु मोबाईल मिळवला, तर त्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याकरता पॅरेंटल कन्ट्रोल ही महत्त्वाची सेटिंग आजकाल सर्वत्र वापरली जात आहे. तर पॅरेंटल कंट्रोल म्हणजे काय त्याचे फायदे काय? हे सारं सविस्तर जाणून घेऊ…

Parental control म्हणजे काय?
सोप्या शब्दात पॅरेंटल कंट्रोल ही एक अशी सेटिंग आहे ज्याद्वारे कोणताही स्मार्टफोन वापरकर्ता मोबाईलमध्ये कोणत्या गोष्टी वापरू शकतो आणि ज्या व्यक्तीला तो आपला फोन देणार आहे तो कोणत्या गोष्टी वापरू शकत नाही हे ठरवू शकतो. मोबाईल वापरकर्ता त्याच्या फोनमध्ये असलेल्या अॅप्स आणि डॉक्युमेंट्सवर असे लॉक लावू शकतो जे समोरच्याला दिसत नाही आणि उघडताही येत नाही.

स्मार्टफोनमध्ये पॅरेंटल कंट्रोल ठेवण्याचा मुख्य उद्देश हा आहे की जर तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल फोन वापरायला देत असाल तर तुमची मुले फोनमध्ये कोणते अॅप्स इत्यादी वापरू शकतात हे तुम्ही आधीच निवडू शकता. यामुळे मुलांना हवं तसं स्मार्टफोन वापरण्याचं स्वातंत्र्य मिळतं नाही. तुम्ही निवडाल त्याच गोष्टी ते वापरु शकतात.

पॅरेंटल कंट्रोल फीचरच्या माध्यमातून मुलांना नकोत्या अॅप्सपासून दूर ठेवता येते, त्याचवेळी इंटरनेट ब्राउझ करताना कोणत्या प्रकारच्या वेबसाइट्स येऊ नयेत हेही ठरवता येते. त्याचप्रमाणे फोनमध्ये कोणते फोटो, व्हिडिओ आणि अॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी आहे आणि कोणती नाही, हे देखील पालकांच्या नियंत्रणाखाली येते.

स्मार्टफोनमध्ये पॅरेंटल कंट्रोल कसे सक्रिय करावे?
1. प्रथम तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा.
2. खाली स्क्रोल केल्यावर, तुम्हाला पॅरेंटल कंट्रोल्सचा पर्याय मिळेल. याशिवाय तुम्ही डायरेक्ट सर्च देखील करू शकता.
3. सेट अप पॅरेंटल कंट्रोल वर क्लिक करा.
4. येथे तुम्हाला मुलांसाठी नवीन खाते तयार करण्यास सांगितले जाईल, एकतर नवीन खाते तयार करा आणि आधीपासून तयार केलेले Gmail खाते प्रविष्ट करा.
5. खाते तपशील टाकल्यानंतर, फोनचा पासवर्ड विचारला जाईल, तो टाकून तुम्ही Parental control सक्रीय करु शता.

Parental control चा वापर
पॅरेंटल कंट्रोलद्वारे चाइल्ड प्रोफाईल सक्रिय केल्यानंतर, यादी उघडेल ज्यामध्ये फोनमध्ये असलेल्या सर्व अॅप्सचा समावेश असेल. या यादीतून तुम्ही चाइल्ड यूजरला कोणत्या अॅपला ऍक्सेस द्यायचा आणि कोणत्या अॅपला ऍक्सेस देऊ नये हे निवडू शकता.

Parental control चे फायदे
1. मुलं वापरत असलेल्या स्मार्टफोनवर पूर्णपणे नजर ठेवली जाऊ शकते.

2. इंटरनेटवर काय शोधले जात आहे ते ट्रॅक करू शकता.

3. इंटरनेट डेटा वापरण्याची वेळ आणि नेमका डेटा हेही तुम्ही ठरवु शकता.

4. फोनमध्ये गेम कसे खेळता येतील याच्या मर्यादेसोबतच नको असलेले गेमही ब्लॉक केले जाऊ शकतात.

5. जर मूलं घराबाहेर जात असतील तर त्याचे रिअल टाइम लोकेशन ट्रॅक करता येते.

वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *