Headlines

पंकजा मुंडेंच्या नाराजीबद्दल विचारलं असता भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, “पंकजाताईंनी आतापर्यंत कधी त्यांच्या…” | is pankaja munde unhappy bjp maharashtra chief chandrashekhar bawankule answers scsg 91

[ad_1]

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मागील काही काळापासून पक्षातील काही नेत्यांशी अंतर्गत कलह सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पक्षातील अंतर्गत कलहामुळे त्या नाराज असून त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचसंदर्भात आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना धुळ्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे या पक्षासाठी काम करत असल्याचं सांगत त्यांच्यासंदर्भातील बातम्या कपोलकल्पित असल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> अजित पवारांचं न झालेलं भाषण अन् नाराजी नाट्य: NCP तून कोणी BJP मध्ये आलं तर स्वागत कराल का? बावनकुळेंचं सूचक विधान; म्हणाले, “जो येत असेल…”

पंकजा मुंडे नाराज आहेत का? असा प्रश्न बावनकुळेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “पंकजाताई नाराज नाहीत. माझ्यासोबत रोज बोलतात. परवा दोन तास त्यांच्याकडे जाऊन चर्चा करुन आलो. त्या आमच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्या भाजपाच्या राष्ट्रीय सचीव आहेत. मध्य प्रदेशमध्ये त्या सहप्रभारी आहेत,” असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

“पंकजाताईंनी आतापर्यंत कधी त्यांच्या एकाही स्टेटमेंटमध्ये भाजपाबद्दल किंवा भाजपाच्या विचारांबद्दल अथवा कार्यकर्त्यांबद्दल तसेच भाजपाच्या विचाराला पटणार नाही असं कोणतंही स्टेटमेंट केलेलं नाही,” असंही बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलं. “पंकजाताई पूर्णवेळ पक्षाच्या कामात आहेत. त्या पूर्ण काम करत आहेत. त्या पक्षासाठी झटत आहेत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात ज्या कपोलकल्पित बातम्या बाहेर येत आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत,” अशी अपेक्षाही बावनकुळेंनी व्यक्त केली.

नक्की वाचा >> शरद पवार सोडल्यास राष्ट्रवादी…; भाजपा, PM मोदींवर केलेल्या टीकेवरुन बावनकुळेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

दहा दिवसांपूर्वीच पंकजा मुंडेंनाही त्यांच्या कथित नाराजीबद्दल एका खासगी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी, “मला सर्व चर्चाच व्यर्थ वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व मंत्रिमंडळातील नेत्यांचे चेहरे एका रांगेत लावा, त्यात माझाही फोटो लावा. माझ्या चेहऱ्यात काही कमी फ्रेशनेस आहे का? मी अत्यंत फ्रेश आहे. नाराज असण्याचं काही कारणच नाही? मी रुसणे किंवा नाराज होणे, या फार वैयक्तिक गोष्टी आहेत. त्या सार्वजनिक आयुष्यात किंवा राजकीय आयुष्यात पुढे आणायच्या नसतात, या विचारात मी वाढलेली आहे,” असं स्पष्ट केलं होतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *