Headlines

pankaja munde should get cabinet ministry narendra modi say mahadev jankar ssa 97

[ad_1]

महाराष्ट्रात आज ( ५ सप्टेंबर ) तीन दसरा मेळावे पार पडत आहेत. या मेळाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळे मेळावे होणार आहेत. तर, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्तथितीत भगवानगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यावेळी रासपचे नेते महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंबाबत मोठं विधान केलं आहे.

महादेव जानकर म्हणाले, “सुजय विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं पाहिजे की, पंकजा मुंडेंच्या एका ट्वीटवर लाखो लोक गोळा होतात. त्यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न करावा. मी काही भाजपाचा माणूस नाही, मित्रपक्ष आहे. पंकजा मुंडे आणि महादेव जानकर नसेल, तर तुमचं खरं नाही.”

हेही वाचा – उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कुणाचं भाषण ऐकायची उत्सुकता? पंकजा मुंडे म्हणाल्या,”मी या गोष्टीतून गेले आहे…”

“आमचे शब्द दिल्लीला घेऊन जा…”

“माझी सुजय विखे आणि प्रीतम मुंडेंना विनंती आहे की, तुम्ही दिल्लीचे खासदार येथे आहात. आमचे शब्द दिल्लीला घेऊन जा, ही विनंती आहे. ही पैसे देऊन आलेली माणसं नाही, पदरमोड करून आलेली माणसं आहेत. मुंबई, गुजरातहून लोकं आलेली आहेत,” असेही महादेव जानकर यांनी म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *