Headlines

Panipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?

[ad_1]

Parna Pathe: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड ब्लॉग्स (Food blogging) हे व्हायरल होत असतात. कधी पिझ्झा, पास्ता तर कधी अगदी मराठमोळ्या पदार्थांची अथवा भारतीय पदार्थांचीही खासियत आपल्याला कळते. अनेक सेलिब्रेटीही आपल्याकडील स्ट्रीट फूडचा (Street Food) आनंद लुटताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इंदौर, मध्य प्रदेश येथील सराफा बाजारातील पाणीपुरीचा आनंद लुटला आहे. लोकप्रिय अभिनेत्री पर्ण पेठे हिनं तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून पाणीपुरी (Panipuri) खात असतानाच फोटो शेअर केला आहे. (parna pathe shares an instagram post enjoys eating panipuri at sarafa bazaar in madhya pradesh)

तिच्या या फोटोला तिच्या चाहत्यांच्याही भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. मध्य प्रदेशातील कडाक्याच्या थंडीत पर्ण पाणी पूरीची चव घेताना दिसते आहे. सराफा बाजार (Sarafa Bazaar, Indore, Madhya Pradesh) हे स्ट्रीट फूडसाठी खूप फेमस आहे. इकडची पाणीपूरीचं काय तर कूल्हीही लाजवाब असते…आपला हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना पर्णनं कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भैय्या थोडा और तिखा बनाना – लाईन्स ऑन द वे, असं लिहिलं आहे. या फोटोत पर्ण पाणीपूरी खूपच एन्जॉय करताना दिसते आहे. 

सध्या पर्ण ही ‘चार चौघी’ (Chaar Chaaghi) या अजरामर नाटकातून प्रेक्षकांसमोर आली आहे. या नाटकात पर्ण पेठेसोबत दिग्गज कलाकारही आहेत. पर्णसोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve), अभिनेत्री कादंबरी कदम (Kadambari Kadam) आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगणी (Rohini Hattangadi) यांच्या प्रमुख भुमिका आहेत. या नाटकांनं नुकतेच आपले 50 प्रयोग पुर्ण केले आहेत. या नाटकांनं मराठी रंगभुमीवर एक वेगळा इतिहास रचला आहे. या नव्या पर्वातील चार चौघी हे नाटकंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. सध्या पर्ण ‘अडलंय का?’ आणि ‘चार चौघी’ या दोन नाटकांमध्ये व्यस्त आहे. ‘अमर फोटो स्टूडिओ’ या नाटकातूनही पर्णचा वेगळा अंदाज पाहायला मिळतो आहे. 2023 या वर्षात या नाटकाचे शेवटचे काही प्रयोग होणार आहेत. 

हेही वाचा – VIRAL VIDEO: दारू पिऊन विजेच्या खांबाला कितीतरी वेळ लटकून राहिला… पाहा पुढे काय झालं?

अभिनेत्री पर्ण पेठे सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेता आलोक राजवाडे आणि पर्ण पेठेचे आठ वर्षांपुर्वी लग्न झाले झाले. आलोकही मराठी चित्रपटसृष्टीतला सगळ्यांचा लाडका अभिनेता आहे. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ (Ashlil Udyog Mitra Mandal) या चित्रपटातून ते दोघंही एकत्र दिसले होते. यापुर्वी त्या दोघांनी अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्या ‘रमा माधव’ (Rama Madhav) या लोकप्रिय चित्रपटातून मध्यवर्ती भुमिका केल्या होत्या.

रमा माधवमध्ये पर्ण आणि आलोक यांनी श्रीमंत माधवराव पेशवे (Shrimant Madhavrao Peshwa) आणि त्यांच्या पत्नी रमाबाई पेशवे यांच्या भुमिका निभावल्या होत्या. त्यांच्या या भुमिकांचे सगळीकडून कौतुक झाले होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *