Headlines

“पण एकनाथ शिंदेंच्या काय मनात आलं अन् एकदम…” ‘५० खोके एकदम ओके’ म्हणत अजित पवारांची तुफान टोलेबाजी | ajit pawar criticizes eknath shinde and rebel shiv sena mla on revolt

[ad_1]

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांसह काही अपक्ष लोकप्रतिनिधींनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. या बंडखोरीदरम्यान शिवसेनेचे आमदार महाराष्ट्र राज्य सोडून थेट सुरतेहून गुवाहाटी येथे गेल्यामुळे हे बंड थोपवण्यात अपयश आले. सध्या राज्यात सत्तांतर झाले असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ताशकट हाकत आहेत. या सर्व घडामोडींवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेत भर सभेत तुफान टोलेबाजी केली आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांसमोरच मोठी घोषणा, हात जोडून म्हणाले “मी लवकरच…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री असताना निधीवाटपात भेदभाव केला नाही. मोठ्या प्रमाणावर निधी दिला. करोनाचे सावट असताना निधीमध्ये कपात केली नाही. आमदार निधीमध्ये कपात करण्यात आली नाही. विकासाकामांसाठी पैसे देण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निधीमध्ये कपात केली जातेय, असे जनतेले वाटायला नको, असे मला उद्धव ठाकरे सांगायचे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या कायम मनात आले अणि ते एकदम ४० लोक घेऊन गेले. ते घेऊन गेलेली लोक धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते. पन्नास खोके एकदम ओके हे महाराष्ट्रातील शेवटच्याही माणसाला समजत आहे. असे महाराष्ट्रात कधीही घडले नव्हते, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>> शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, “युती करायची असेल तर…”

बाळासाहेब ठाकरे यांची दसरा मेळाव्याची परंपरा चालत आलेली आहे. मात्र शिवाजी पार्क हे मैदान देण्यासाठी कोर्टात जावे लागले. प्रत्येकाने आपापले विचार मांडावेत. लोकशाहीमध्ये दुसऱ्यांचे विचार आम्ही ऐकून घेणार नाही, असे कसे चालेल. कायदा, नियम, संविधान काय सांगते. याचा विचार करायला हवा, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *