Headlines

पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

[ad_1]

मुंबईदि. 6 : पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे उपायुक्त श्री. सोनावणे उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणालेबौद्ध धर्मातील अत्यंत प्राचीन साहित्य असलेल्या त्रिपिटकांच्या भाषांतरासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करावी. पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी या कामाला प्राधान्य देण्यात यावे.

समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी बार्टीने आतापर्यंत पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी केलेल्या कामाबाबत माहिती बैठकीत  दिली.

000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *