Headlines

PAK vs ENG : पाकिस्तानच्या मैदानात स्क्रिनवर अचानक दिसली साडी घातलेली मिस्ट्री गर्ल; पाहून तुमचंही भान हरपेल

[ad_1]

Pakistan vs England 1st Test : क्रिकेट सामन्यांदरम्यान, आता खेळांडूसोबत कॅमेरामॅनही चर्चेचा विषय ठरत आहेत. फक्त क्रिकेटच नाही तर अन्य खेळांच्या मैदानांवरही हे कॅमेरामन  सर्वांचे लक्ष्य वेधणाऱ्या चाहत्यांवर आपल्या कॅमेरांमध्ये कैद करताना दिसतात. या व्यक्ती सोशल मीडियावर रातोरात व्हायरल होतात आणि सोशल मीडिया स्टार बनतात. असाच प्रकार इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानच्या ( PAK vs ENG)पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान घडला.

इंग्लड विरुद्ध पाकिस्तानचा पहिला कसोटी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर (Rawalpindi Test) खेळवण्यात येत आहे. तब्बल 17 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानात टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी आला आहे. पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या संघाने 75 षटकांत 500 धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानी गोलंदाजांचा यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांनी धुव्वा उडवला आहे. या धावसंख्येसोबतच सध्या एक क्रिकेट चाहतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज बेन डकेट आणि जॅक क्रोली बाद झाल्यानंतर जो रुट आणि ओली पोप फलंदाजी करत होते. यावेळी कॅमेरामनच्या कॅमेरामध्ये एक महिला कैद झाली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रावळपिंडी स्टेडियमजवळील एका टेरेसवर पाकिस्तानी महिला क्रिकेट फॅन साडी नेसून नाचत होती.

अनेक सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. काहींनी या महिलेच्या डान्सचे कौतुक देखील केले आहे. इंग्लंडच्या डावाच्या 42व्या षटकात हा सर्व प्रकार घडला आहे.

पाहा व्हिडीओ –

कोण आहे ही महिला?

कॅमेरामनने महिलेचा डान्स कव्हर करण्यास सुरुवात करताच ती स्टेडियमच्या मोठ्या पडद्यावरही दिसू लागली. मात्र तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे ही महिला कोण आहे, ती कुठे राहते आणि काय करते, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र ती ज्या पद्धतीने नाचत होती ते पाहून स्टेडियममध्ये बसलेल्या लोकांनी स्तुती करण्यास सुरुवात केली. यावेळी समालोचकांनीही Beautiful Scenes म्हणत या महिलेला दाद दिली.

दरम्यान, इंग्लंडने चार फलंदाजांच्या शतकांच्या जोरावर 657 धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूकने 153 धावा करून बाद झाला. 116 चेंडूत 19 चौकार आणि 5 षटकारासह त्याने सर्वाधिक धावा केल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *