Headlines

आऊट ऑफ फॉर्म ‘विराट’चा मोठा विक्रम, संपूर्ण आशिया खंडातून ठरला अव्वल

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या अडीच वर्षांपासून फॉर्ममध्ये नाही आहे. इतक्या वर्षात त्याला एकही शतक ठोकता आले नाही आहे. त्यामुळे सततच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यात आता विराटने एक मोठा विक्रम केला आहे. हा विक्रम आशिया खंडात तरी कोणत्याच खेळाडूला करता आला नाहीए, त्यामुळे विराटच्या या रेक़ॉर्डची चर्चा होतेय.

कोहली अव्वल 
इंस्टाग्रामची 2022 ची रिच लिस्ट जारी करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये इंस्टाग्रामवरील एका पोस्टवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या आशियाई खेळाडूंमध्ये कोहली अव्वल आला आहे. तर एकूण खेळाडूंच्या यादीत कोहली जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतंच hopperhq.com ने 2022 ची इंस्टाग्राम रिच लिस्ट जारी केली आहे. यानुसार विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टवरून $1,088,000 (जवळपास 8.69 कोटी रुपये) कमावतो. अशाप्रकारे तो आशियातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. कोहलीचे सध्या 20 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

रोनाल्डोची सर्वांधिक कमाई 
इंस्टाग्राम रिच लिस्टनुसार जगभरातून पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे. त्याला एका पोस्टमधून $2,397,000 (सुमारे 19 कोटी रुपये) मिळतात. दुसर्‍या क्रमांकावर अमेरिकन महिला सेलिब्रिटी काइली जेनर आहे, जी एका पोस्टमधून $ 1,835,000 (सुमारे 14.67 कोटी) कमवते. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर स्पोर्ट्स पर्सन फुटबॉलर लिओनेल मेस्सी आहे. एका पोस्टमधून मेस्सीची कमाई $1,777,000 (जवळपास 14 कोटी रुपये) आहे.

बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव
जगभरातील सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली 14 व्या क्रमांकावर आहे. कोहलीनंतर या यादीत दुसरी आशियाई अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. ती देखील भारताचीच आहे. प्रियांकाची एका पोस्टमधून $423,000 (जवळपास 3.38 कोटी रुपये) कमाई आहे.

दरम्यान आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराटच्या या अनोख्या विक्रमाची आता चर्चा होतेय.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *