Headlines

OTT चा लोकप्रिय ‘गुंडा’, हॉलिवूड चित्रपटात भूमिका अन् सुप्रसिद्ध अभिनेत्रीशी विवाह; ओळखा पाहू कोण आहे कलाकार?

[ad_1]

मुंबई : आपले आवडते बॉलिवूड सेलिब्रिटी काय करतात ते कुठे राहतात हे जाणून घ्यायचं असतं. एवढंच काय तर त्यांचे फोटो आणि त्यात लहाणपणीचे फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात ते सेलिब्रिटी कोण आहेत असे देखील आपल्याला ओळखण्यास सांगितले जाते. आज आपण अशाच एका सेलिब्रिटीचा फोटो पाहणार आहोत ज्या अभिनेत्यानं हॉलिवूडमध्येही आपल नाव गाजवलं आहे. हा सेलिब्रिटी कोण आहे ओळखून दाखवा… (this child sitting with mother is today biggest goon of ott even worked in hollywood films who is he) 

हा अभिनेता आज आज बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. या अभिनेत्याला खरी ओळख ही ‘मिर्झापूर’ (Mirzapur) या वेबसीरिजमधून मिळाली. हा अभिनेता दुसरा कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता अली फजल (Ali Fazal) आहे. फोटोत अली फजल त्याच्या आईसोबत दिसत आहे. हा अलीचा बालपणीचा फोटो आहे. अली फजलने ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजमध्ये गुड्डू भैय्या ही भूमिका साकारली होती. अलीकडेच त्यानं बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत लग्न केलं.

अली फजलने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये अली फजलची आई नाश्त्याचा आनंद घेताना दिसत आहे. तर त्यांच्या शेजारी बसलेला गोंडस अली हसताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवर ‘क्यूट’, ‘लव्हली’, ‘सुंदर’ अशा कमेंट केल्या आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *