Headlines

‘या’ मराठी अभिनेत्याचं होतंय कौतुक, ‘गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू येणार इतक्यातंच….’

[ad_1]

मराठी संगीतविश्वातील शिंदे घराण्याचा दबदबा पाहायला मिळतो. ज्येष्ठ अभिनेते प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे हा देखील संगीत क्षेत्रातही सक्रीय आहे. तो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात झळकला. त्याने चाहत्यांच्या मनात त्याचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे उत्कर्ष शिंदे हा मालिका, चित्रपट क्षेत्रातही काम करत आहे. आता उत्कर्ष शिंदेंच्या सतर्कतेमुळे एका प्राण्याचा जीव वाचला आहे. त्याने स्वत: पोस्ट करत याबद्दल सांगितले आहे. 

उत्कर्ष शिंदे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. उत्कर्षने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात उत्कर्षने एका फायटरची गोष्ट सांगितली आहे.  उत्कर्षने चक्क हायवेवर उतरुन एका कुत्र्याच्या पिल्लाचा जीव वाचवला आहे. त्याने यावेळी नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

उत्कर्ष शिंदेने सांगितली नेमकी घटना?

“फाईटर” वर ‘संक्रांत आली होती का? माहिती नाही पण “संकट “नक्कीच आल होत.. छत्रपती संभाजी नगर मधे सामाजिक रित्या माझा वाढदिवस साजरा करुन भल्या पहाटे मुंबईसाठी परत निघालो. गरमा गरम हुरडा खात, गार वारा कापत प्रवास सुरु होता. हायवे वर एका मागोमाग भरधाव वेगाने वाहने धावत होती. आणि तितक्यात नगर येता येता रस्त्याच्या मधो मध दिसला एक चिमुकला “फाइटर”. एका पायाने लंगडत हायवे वर त्याच्या आईला शोधत सैरावैरा जिवाच्या आकांताने मधोमद पळणार घाबरलेल वाट विसरलेल एक चिमुकल कुत्र्याच पिल्लू. आमच्या गाडी समोर फाईटर दिसताच आम्ही कार कशी बशी कंट्रोल करत रसत्याच्या कडेला थांबवली. खरा काऊंटडाऊन सुरू झाला होता तो तेव्हाच. भीती होती ती आता मागून दुसऱ्या कोणत्या तरी गाडी खाली त्याचा जीव जाऊ नये ह्याची. तसाच गाडीतून मी उतरुन उलट हायवे वर धावत रस्त्याच्या मधोमध फाईटर च्या मदतीस पोहोचलो त्याला उचललं. 

पाहिल तर एका पायाला जखम असल्याने तो लंगडत होता. विचार केला ह्याची आई जवळ आस पास असेल.ह्याला इथेच झाडात सोडू,म्हणजे हा सुखरुप राहील. पण का जाणे ते पिल्लू केविलवाण्या नजरेन बघू लागलं. एक क्षण विचार केला आणि पुन्हा त्या पिल्लाला उचललं आणि गाडीत सोबत घेऊन आलो. त्याला दुसरं कुठे लागलं नाही ना? चेक करत करत. तो भूकेला असेल तहानेजला असेल आधी ह्याला एनर्जी मिळावी म्हणजे हा स्थिर होईल ह्या विचाराने. त्या पिल्ला घेऊन पुढे एका द्याब्यावर थांबलो त्याला पाणी पाजल-बिस्कीट खाऊ घातल, त्याच्या पायाला औषध लावाल. आणि काही काळ आम्ही गूळाचा चहा घेत तिथे थांबलो. तेथील काही चाहत्यांनी सेल्फी घेतले. काहींनी त्या पिल्ला बद्दल विचारपुस केली. मांडीत बसलेला जखमी पिल्लू पाहून तेथील एकाने मी हे पिल्लू घेऊ का? मी त्याचा संभाळ करतो सर म्हणत मायेने त्याला जवळ घेतलं आणि त्याची पुढील जबाबदारी घेतली. 

आणि मनात विचार आला. आता हे पिल्लू जगेल पुढच्या कैक संक्रांती बघण्यासाठी. आजच्या ह्या संकटाला हरवून एका फाईटर सारखा निरोप घेतला निघालो पण या घटनेतून मी एक गोष्ट नक्कीच शिकलो. मी का बर हे टेन्शन मागे लाऊन घेऊ? माझं थोडीच हे काम आहे? मला काय गरज ? आपण बऱ्याचदा हे विसरून जातो की आपल्या छोट्याश्या मदतीने कोणावर ओढावणारी वाईट गोष्ट टळू शकते. इट्स अ सर्कल. तुम्ही मदत करा कोणाची तरी तुमची मद्दत करायला नक्कीच कोणीनं कोणी येईलच. आज तिळगूळ देऊन फक्त वरून गोड गोड बोलायचं नाही, तर जिथे जाऊ तिथे गोडवा पसरवायचा प्रयत्न करायचा, असे उत्कर्ष शिंदे म्हणाला. 

दरम्यान उत्कर्ष शिंदेच्या या पोस्टनंतर अनेक चाहते त्याचे कौतुक करत आहेत. अभिनेता गौरव मोरेने त्याच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. गौरव मोरेने ‘भाई’ असे म्हणत हार्ट आणि हात जोडण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. त्यावर उत्कर्षने ‘तू दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद भावा’, असे म्हटले आहे. तसेच अनेक चाहते या व्हिडीओवर कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तर काहींनी चांगलं काम असं म्हणत त्याचे कौतुक केले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *