Headlines

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची ‘डुबती नैय्या’ सलमानही तारु शकला नाही, हत्येचा आरोप होताच करिअर लयास

[ad_1]

मुंबई : अभिनेता सलमान खान, सहसा बऱ्याच नवोदित कलाकारांच्या करिअरला कलाटणी देण्यासाठी ओळखला जातो. आतापर्यंत त्यानं बऱ्याच नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्याची संधी दिली आहे. यामध्ये सेलिब्रिटींच्या मुलांचाही समावेश आहे. 

(Salman khan) सलमाननं आतापर्यंत अनेकांनाच यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. पण, एका अभिनेत्रीच्या बाबतीत मात्र त्यालाही अपयशाचा सामना करावा लागला. ही अभिनेत्री म्हणजे, डेझी शाह (Daisy Shah). 

विश्वास बसणार नाही, पण डेझीवर हत्येचाही आरोप करण्यात आला होता. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये डेझी या वादात अडकली होती. भोजपूरी अभिनेता सत्येंद्र सिंह यांनी तिच्यावर हा आरोप केला होता. (even salman khan failed to build career for bollywood actress Daisy Shah)

डेझीसह रजनीश दुग्गल, गणेश आचार्य आणि ‘सोडा’ या चित्रपटाशी संबंधित काही कलाकारांवही हा आरोप केला होता. खुद्द सत्येंद्र यांनी यासंदर्भातील माहिती दिली. ज्यावेळी त्यांना या चित्रपटासाठी निवडलं गेलं तेव्हा डेझीही त्यात होती. पण, तिला चित्रपटात कोणा मोठ्या कलाकाराला घ्यायचं होतं. ज्यामुळं तिनं आपल्याला हटवल्याची बाब त्यांनी प्रकाशात आणली. 

सत्येंद्रऐवजी चित्रपटात रजनीश दुग्गलला स्थान मिळालं. ज्यानंतर जेव्हा सत्येंद्र मूळ गावी परत आला, तेव्हा त्याचा एक अपघात झाला. पण, हा अपघात नसून, घातपात असल्याचं म्हणत त्यानं डेझी, गणेश आचार्य आणि रजनीश दुग्गल यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. 

डेझी चित्रपटांमुळे जितकी चर्चेत आली नाही, तितकी ती या प्रकरणामुळे प्रकाशझोतात आली होती. पण, आपल्यावर झालेले हे सर्व आरोप तिनं फेटाळून लावले. सलमानसोबत डेझीनं ‘जय हो’ या चित्रपटात स्क्रीन शेअर केली. पण, तिथंसुद्धा तिला अपयशाचा सामना करावा लागला. (Bollywood Movie)

गणेश आचार्यसोबत रिलेशनशिप?
(Ganesh Acharya) नृत्यक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या डेझीनं सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य याच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं. तीन वर्षे ती त्याची असिस्टंट म्हणूनही काम पाहत होती. ‘जमीर’ आणि ‘खाकी’ या चित्रपटांसाठी तिनं त्याला असिस्टही केलं होतं. दरम्यानच्या काळात डेझी आणि गणेश रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं गेलं. ज्यामुळं गणेशच्या खासगी जीवनात वादळंही आली. पुढे त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि डेझी गणेशला टाळताना दिसू लागली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *