Headlines

‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमापोटी अदनान सामी Dippression मध्ये, मग पुढे….

[ad_1]

Adnan Sami: आवाजाने लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणारा प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) याचा आज 51वा वाढदिवस आहे. त्याचा गाण्यांसोबत त्याची लव्ह लाइफ (Love Life) आणि लग्नांमुळे ( Marriage) तो कायम चर्चे राहिला आहे. तुम्हाला माहिती आहे का ऋषी कपूरच्या या अभिनेत्रीवर खूप प्रेम करायचा अदनान सामी. 

अदनान सामी याने चार लग्न केली आहे अनेकांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, त्याने तिसरं लग्न त्याच्या दुसऱ्या पत्नीशी केलं आहे. अदनान सामीच्या वाढदिवसानिमित्त त्याची लव्ह लाइफबद्दल जाणून घेऊयात. (trending news happy birthday adnan sami know about his love life wife controversy in marathi)

ऋषी कपूरच्या अभिनेत्रीवर जडलं होतं प्रेम 

‘हिना’ हा ऋषी कपूरचा चित्रपट आठवतो तुम्हाला, त्यातील अभिनेत्री जेबा बख्तियार ही अदनानचं पहिलं प्रेम होती. अदनान आणि जेबाने सरगम या पाकिस्तानी चित्रपटात एकत्र काम केलं. जेबा बख्तियार ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. अदनाने वयाच्या 22 व्या वर्षी पहिलं लग्न केलं. तर त्यावेली जेबा 31 वर्षांची होती आणि तिचं हे तिसरं लग्न होतं. त्यांना एक मुलगा असून पुढे हे दोघे 1996 मध्ये वेगळे झाले. या घटस्फोटानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. 

बिझनेसवुमनचा प्रेमात 

घटस्फोटानंतर 2001मध्ये अदनान दुबईतील बिझनेसवुमन अरब सबा गलाद्रीच्या प्रेमात पडला. त्यांनी लवकरच लग्नही केलं. मात्र हेही लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

सबासोबत पुनर्विवाह

अदनान आणि सबाने आपल्या नात्याला पुन्हा संधी देण्याचं ठरवलं आणि 2007 मध्ये त्यांनी पुन्हा लग्न केलं. पण प्रयत्न करुनही दोघांचं काही सूत जुळलं नाही. 2009 मध्ये घरगुती हिंसाचाराचा आरोप करत सबाने पुन्हा घटस्फोटासाठी अर्ज केला. या प्रकरणात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अदनानची पहिली पत्नी आणि अभिनेत्री झेबा त्याचासोबत खंबीरपणे उभी होती. अदनानला या आरोपातून वाचविण्यासाठी ती समोर आली. 

दूरसंचार अभियंत्याशी चौथे लग्न

यानंतर अदनानने अफगाण आणि जर्मन वंशाच्या दूरसंचार अभियंता रोया फरियाबीशी 2010 मध्ये चौथं लग्न केलं.  ‘3 इडियट्स’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये अदनान आणि रोया सोबत दिसले होते. त्यांनी मिदना नावाची एक मुलगी आहे. 

155 किलो वजन कमी घटवलं

पहिल्या प्रेमाच्या जखमा आणि मुलापासून दुरावा यातून अदनानने डिप्रेशनमध्ये खूप खालं. त्यामुळे त्याचं वजन झपाट्याने वाढलं. त्यावेळी अदनानचं वजन 230 किलो गेलं होतं. पण 2007 मध्ये अदनान परत चर्चेत आला आणि यावेळी तो वजन कमी केल्यामुळे त्याची चर्चा झाली. अदनानने 16 महिन्यांमध्ये 155 किलो वजन कमी केलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *