Headlines

Oops: ते फॅशन वगैरे ठिक, पण रश्मिकानं असं का केलं? ‘लिंबू कलरच्या’ विचित्र ड्रेसमुळं अभिनेत्री अडचणीत

[ad_1]

मुंबई : रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही अभिनेत्री फक्त दाक्षिणात्यच नव्हे, तर हिंदी आणि इतरही विविधभाषी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मागील काही वर्षांमध्ये रश्मिकाच्या लोकप्रियतेत लक्षणीयरित्या भर पडली आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती देखण्या आणि निरागस रुपासाठीही तितकीच गाजलेली अभिनेत्री आहे. 

अशा या रश्मिकाच्या सध्या एअरपोर्ट वाऱ्या जास्तच होताना दिसत आहेत. चित्रपट, चित्रीकरण आणि विविध कामांसाठी तिचं बऱ्याच ठिकाणी येणंजाणं सुरु असतं. ज्यामुळं ती अनेकदा विमानतळांवर दिसते. 

नुकतंच असंच काही घडलं जिथं तिनं एअरपोर्ट लूकसाठी लिंबू रंगाचा एक लॉग टॉप तिनं घातला होता. तिला या लूकमध्ये पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तिला पाहिल्यानंतर लगेचच काही चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. 

काहींनी तिला पाहून हात उंचावला. चाहत्याच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी म्हणून रश्मिकानंही हात उंचावून अभिवादन केलं. त्याचवेळी ड्रेसमुळं ती काहीशी अडचणीत आली. अचानकच रश्मिकाच्याही ही बाब लक्षात आली. 

ड्रेसमुळं आपल्याला अडचण होत असल्याचं तिच्याही लक्षात आलं हे रश्मिकाच्या चेहऱ्यावरचे भाव सांगून गेले. अशा प्रसंगांचा सामना करण्याची रश्मिकाची ही पहिलीच वेळ नाही. 

यापूर्वीही फॅशनच्या नादात तिनं अशाच काही आऊटफिट्सना पसंती दिली होती. तेव्हाही तिला अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता. फक्त अडचणीच नव्हे, तर रश्मिका यामुळं सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही बळी पडली होती. 

फॅशनच्या दुनियेतील ट्रेंड फॉलो करता करता अभिनेत्रींकडून होणाऱ्या या चुका तरी त्यांना काही शिकवणार का, हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *