Headlines

ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर घाबरून न जाता, घर बसल्या अशी करा तक्रर, पाहा स्टेप्स

[ad_1]

नवी दिल्ली: Cyber Frauds:तंत्रज्ञानाच्या आगमनाने जीवन खूप सोपे झाले आहे. प्रत्येक कामात आता Technology चा वापर होतो. त्याशिवाय, दैनंदिन आयुष्याची कल्पना करणेच अशक्य झाले आहे. वीज बिल भरणे, तिकीट बुक करणे, यासह अनेक महत्वाची कामं करण्यासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. पण, इंटरनेटच्या अतिवापरामुळे बँकिंग फसवणूक, Cyber Attacks , Online Scams आणि इतर अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे गेल्या काही काळात पाहायला मिळाले आहे. अशात, नागरिकांच्या मदतींसाठी भारत सरकारने एक सायबर क्राईम पोर्टल सुरू केले आहे, जेथे Cyber Hackers विरुद्ध तक्रार नोंदविता येते.

वाचा: Smartphone Offers: विवोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट, सोबत १७ हजार रुपयांपर्यंतची विशेष ऑफर

सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी करावी:

यासाठी cybercrime.gov.in उघडा. ‘File A Complaint’ या पर्यायावर क्लिक करा. अटी व शर्ती स्वीकारा. ‘रिपोर्ट अंडर सायबर क्राइम’ बटणावर क्लिक करा. तुम्ही विद्यमान युजर असल्यास तपशील प्रदान करा किंवा नवीन खाते तयार करण्यासाठी नवीन युजरसाठी क्लिक करा. ‘Citizen Login’ निवडा आणि तपशील नमूद करा ज्यात राज्य, युजर नेम आणि मोबाईल नंबर समाविष्ट आहे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP आणि कॅप्चा एंटर करा.

वाचा: Smart TV Offers :OnePlus चा स्मार्ट टीव्ही स्वस्तात येणार घरी, मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा ऑफ, पाहा डिटेल्स

आता सबमिट बटणावर क्लिक करा. पुढील पेज तुम्हाला फॉर्ममध्ये आवश्यक माहिती एंटर करण्यास सांगेल. फॉर्ममध्ये ४ भाग आहेत, ज्यात घटनेचे तपशील, संशयित तपशील, तक्रारीचे तपशील आणि पूर्वावलोकन आणि सबमिट करणे समाविष्ट आहे. घटना तपशील स्तंभाखाली विचारलेले तपशील प्रविष्ट करा. Save & Next वर क्लिक करा. संशयित तपशील विभागांतर्गत, नाव, ओळखीचा पुरावा किंवा तुमच्याकडे असलेल्या इतर कोणत्याही प्रमाणपत्राचा तपशील द्या. तक्रार तपशील पर्यायाखाली तुमचा तपशील जसे की ई-मेल आयडी इत्यादी एंटर करा आणि पुढील स्टेप्सवर जा. सर्व Details Verify केल्यानंतर कन्फर्म करा आणि सबमिट करा बटणावर क्लिक करा. तुमची तक्रार नोंदवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही तक्रारीची पीडीएफ फाइलही डाउनलोड करू शकता.

वाचा: घर बसल्या दुरुस्त करा PAN Card मधील नावातील चूक, ५ मिनिटांत होईल काम, प्रोसेस खूप सोपी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *