Headlines

ओम पुरी यांचे वयाच्या 14 व्या वर्षी होते 55 वर्षीय मोलकरणीसोबत शारीरिक संबंध

[ad_1]

मुंबई : चित्रपटसृष्टी असो की रंगभूमी, ओम पुरी यांचं नाव आजही मोठ्या आदराने घेतलं जातं. 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियाणातील अंबाला येथे जन्मलेल्या ओम पुरी यांचं बालपण मोठ्या कष्टात गेलं. कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी त्यांना ढाब्यावरही काम करावं लागलं. ते ढाब्यावर भांडी धुण्याचं काम करायचे, मात्र काही दिवसांनी ढाब्याच्या मालकाने त्यांच्यावर चोरीचा आरोप करून त्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. पुढे ओम पुरी हे हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते बनले.

ओम पुरी हे गंभीर अभिनेते असले तरी त्यांची दुसरी पत्नी नंदिता पुरी यांनी त्यांच्याबद्दल असे काही खुलासे केले होते जे ओम पुरी यांना जगापासून लपवायचे होते. ओम पुरी यांचं वयाच्या 14 व्या वर्षी एका मोलकरणीसोबत प्रेमसंबंध होते हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहिती नसेल तर आज आम्ही सांगणार आहोत.

ओमची पत्नी नंदिता यांनी त्यांच्यावर ‘अनलाइकली हीरो: ओम पुरी’ नावाचे पुस्तक लिहिलं आहे. ओम पुरी यांचं लहान वयातच त्यांच्या मोलकरणीसोबत अवैध संबंध असल्याचं या पुस्तकात उघड झालं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ओम पुरी हे १४ वर्षांचे होते जेव्हा त्यांनी पहिल्यांदा एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. ओम यांच्या मामाच्या घरी 55 वर्षांची मोलकरीण काम करायची, जिच्याशी ओम यांचे संबंध होते.

या पुस्तकात नंदिता पुरी यांनी लिहिलं आहे की, ओमला लहानपणापासूनच मोठ्या स्त्रिया आवडत होत्या. त्यामुळे त्याचं पहिलं 55 वर्षांच्या मोलकरणीसोबत संबंध होते, त्यानंतर त्यांची दुसरी मोलकरीण लक्ष्मीसोबतही त्याचे संबध होते. मात्र, या पुस्तकामुळे ओम पुरी आणि नंदिता यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर आलं होतं.

पुस्तकात ओम पुरी यांची वैयक्तिक माहिती उघड झाल्यानंतर ओम पुरी आणि त्यांची पत्नी नंदिता यांच्यातील संबंध बिघडल्याचं बोललं जात आहे. ओमला नंदिताचा खूप राग आला कारण तिने ओम यांच्या आयुष्यातील अनेक गुपितं त्यांच्या इच्छेशिवाय उघड केली होती. या घटनेनंतर ओम पहिल्या पत्नीसोबत राहू लागले. नंतर ओम आपल्या मुलाच्या निमित्तानं घरी परतले.

ओम पुरी यांचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा वादात सापडलं होतं. त्यांनी दोन लग्न केली होती. पहिल्या पत्नीचे नाव सीमा आहे, जिच्यापासून त्यांनी घटस्फोट घेतला आणि नंदिता पुरीसोबत लग्न केलं. ओम पुरी यांना नंदितापासून इशान नावाचा मुलगाही आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *