Headlines

ओबीसी आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना निवेदन

बार्शी/प्रतिनिधी – ओबीसी पदोन्नती व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वंजारी सेवा संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वंजारी सेवा संघ विभागीय कार्याध्यक्ष श्री मदन दराडे , सोलापूर जिल्हाध्यक्ष राजेश बांगर , जिल्हा सरचिटणीस रामेश्वर चौरे , जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जाधवर , तालुका अध्यक्ष ईश्वर जाधवर उपस्थित होते.

निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत –

मा. उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 27 97 दोन हजार पंधरा प्रकरणी दिनांक 4 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या निर्णयान्वये पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरवले असले तरी या निर्णयास माननीय सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्थगिती दिली नसल्याने व पदोन्नतीती कोट्यातील मागासवर्गीयांची 33 टक्के आरक्षित पदे भरण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने दिनांक 7 मे 2019 रोजी चा तडकाफडकी काढण्यात आलेला शासन निर्णय संविधान विरोधी असल्याने तो पूर्णतः विनाविलंब रद्द करण्यात यावा.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2001 या महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण अधिनियमामध्ये पदोन्नती मधील आरक्षण देण्याची तरतूद आहे त्यानुसार ओबीसींना ही पदोन्नती मध्ये आरक्षण मिळावे.

ज्या ज्या वेळी ओबीसींच्या सवलतीचा मुद्दा पुढे येतो त्यावेळेस ओबीसींच्या निश्चितच लोकसंख्येवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते .विधानसभेने एकमताने पारित केलेल्या जातिनिहाय जनगणना बाबत ठरावानुसार केंद्र सरकार जनगणना करीत नसेल तर राज्य शासनाने राज्याची जातिनिहाय जनगणना करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *