Headlines

या ग्रहावरील कुठलीच ताकद आपल्याला वेगळं ठेवू शकत नाही; जॅकलीनच्या लव्हरचं जेलमधून प्रेमपत्र!

[ad_1]

Sukesh Chandrashekhar Wished Jacqueline Fernandez : दिल्लीतील तिहार या तुरुंगात असलेल्या शिक्षा भोगणाऱ्या महाठग सुकेश चंद्रशेखर यानं आज बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला तिच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेशनं तिच्यासाठी एक लव्ह लेटर लिहिलं आहे. या पत्रात सुकेशनं जॅकलीनला ‘माय बेबी गर्ल’ असं म्हटलं आहे. आज जॅकलीनचा 38 वा वाढदिवस आहे. सुकेशवर 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला असून त्या प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसची चौकशी सुरु आहे. सुकेशविषयी माहित असतानाही तिनं त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्या. 

सुकेशनं जॅकलीनला लिहिलेल्या पत्रात तो म्हणाली की बेबी गर्ल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यावर देवाचा आशीर्वाद असू दे. माझी बेबी गर्ल. तुझा वाढदिवस प्रत्येक वर्षी माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस असतो. हा दिवस माझ्यासाठी माझ्या वाढदिवसा पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. जसा दिवस जातो तशी तू सुंदर आणि तरुण दिसतेस. मला तुझी खूप जास्त आठवण येते. तुला त्याची कल्पना नाही.’

Sukesh Chandrashekhar Wrote A Letter

पुढे तो म्हणाला की ‘मला तुला परदेशात मिळणारी फुलं भेट करायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जादुची मिठी आणि केकचे आपले यश. बेबी, मला खरंच आशा आहे की तुला तुझं वाढदिवसाचं गिफ्ट आवडेल. मला कळतंय ज्याप्रकारे तू प्राण्यांसाठी काम करतेस. त्या चांगल्या कामासाठी सोनं, हिरे किंवा मोती सारखी कोणतीच महागडी गोष्ट मिळू शकत नाही. बेबी, या चिठ्ठीसोबत जे ग्रीटींग मिळेल ते मी स्वत: माझ्या हातानं बनवलं आहे. आपण काही सुंदर आठवणी बनवल्या आहेत, त्या या चांगल्या दिवशी आठवत आहेत. ‘ सुकेश चंद्रशेखरचे वकील अनंत मलिक यांनी शुक्रवारी हे पत्र प्रदर्शित केलं आहे. 

हेही वाचा : शाहरुख खानकडून फॅनला चक्क शिवीगाळ! म्हणाला, ‘तेरी…’

पुढे सुकेश म्हणाला, ‘बेबी, या ग्रहावर असं काहीच नाही जे आपल्या लांब करू शकतं. कारण आपलं प्रेम खरं आहे. या ग्रहावर असलेली कोणतीच गोष्ट आपल्याला कितीही प्रयत्न केलं तरी लांब करू शकत नाही. इतकंच नाही तर मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून ही कोणी थांबवू शकत नाही. आपण एकमेकांसाठी बनलो आहोत. हे सगळं लवकरच संपेल पुढच्या वर्षी तुझा वाढदिवस एकत्र साजरा करू आणि वचन देतो की तो अजून खास असेल.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *