Headlines

nitin raut criticized arvind kejariwal after demand to print lakshmi and ganpati photo on currency spb 94

[ad_1]

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावण्याची मागणी केली होती. केजरीवालांच्या या मागणीनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही ट्वीट करत अरविंद केजरीवालांवर टीका केली आहे. तसेच नोटांवर महात्मा गांधींबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नको? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – ‘नोटांवर लक्ष्मी-गणपतीचा फोटो लावा’ अरविंद केजरीवालांच्या मागणीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “केंद्र आणि केजरीवाल मिळून…”

नेमकं काय म्हणाले नितीन राऊत?

“अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात काही विशेष फरक नाही. दोघेही संविधान विरोधी आणि ढोंगी आहेत. धार्मीक अफूची ठेकेदारी करणारे केजरीवाल असो किंवा आरएसएस-भाजपा असो, हे नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा अवमान करत आले आहेत.”, अशी टीका नितीन राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – “नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा,” केजरीवालांची पंतप्रधान मोदींकडे मागणी, सांगितलं कारण

“अरविंद केजरीवाल ज्या शाळांची ब्रॅंडींग करतात, त्या शाळेत त्यांनी स्वत: शिक्षण घ्यायला हवं. त्यांना जर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचे विचार कळले असते, तर त्यांना आज धार्मीक नशा विकण्याची गरज पडली नसती”, असेही ते म्हणाले. तसेच “नोटांवर महात्मा गांधींबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नको?” अशी विचारणाही त्यांनी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *