Headlines

नितेश राणेंच्या ‘आईसक्रीम कोन’च्या विधानावर ठाकरे गटातील महिला नेत्या आक्रमक; म्हणाल्या “तुम्ही नागरिक म्हणून…” | kishori pednekar criticizes nitesh rane over commenting on flaming torch logo of uddhav thackeray group

[ad_1]

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. या दोन्ही गटांच्या संघर्षामध्ये भाजपाचे नेतेही उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधताना दिसत आहेत. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला मिळालेले निवडणूक चिन्ह मशाल नसून तो आईसक्रीमचा कोन आहे, असे विधान केले आहे. राणेंच्या या विधानावर उद्धव ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> “शिंदे गटातील काही आमदार नाराज”; अजित पवारांचं विधान, चंद्रकात पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले, “सरकार स्थापनेपासूनच…”

रविंद्र वायकर यांनी वास्तव सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दिलेले चिन्ह हे मशाल आहे. त्यांच्या (शिंदे गट) निवडणूक चिन्हाबद्दल लोक ढाल कोणाची आणि तलवार कोणाची, असे म्हणत आहेत. मात्र आम्हाला मिळालेले मशाल हे निवडणूक चिन्ह शिवसेनेचेच होते. हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेले आहे. तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही का? तुम्ही भारतीय नागरिक म्हणून योग्य आहात का? असे सवाल किशोरी पेडणेकर यांनी केले आहेत.

हेही वाचा >>> Swords and Shield Symbol: शिंदे गटाच्या ‘ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध, निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र

नितेश राणे काय म्हणाले होते?

“उद्धव ठाकरे या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही. कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. हा माणूस (उद्धव ठाकरे) थंड पडला आहे. आग पूर्णपणे विझलेली आहे, हे कदाचित निवडणूक आयोगाच्या लक्षात आले आहे. हा थंड माणूस आहे, त्यांच्या हातात आईस्क्रीमचा कोन द्यावा, असे आयोगाला वाटले असेल. म्हणूनच निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला. आता कोन घेऊन ते आणि त्यांचा मुलगा फिरतील” असा टोमणा नितेश राणेंनी लगावला.

हेही वाचा >>> ‘५० खोके एकदम ओक्के’ म्हणून डिवचणाऱ्या ठाकरे गटाला दीपक केसरकरांचा इशारा; म्हणाले, “येत्या दोन दिवसांत…”

रवींद्र वायकर काय म्हणाले होते?

नितेश राणे यांच्या या प्रतिक्रियेनंतर उद्धव ठाकरे गटातील नेते तथा आमदार रविंद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. “ती मशाल नसून कोन आहे, असे त्यांचे म्हणणे असेल तर त्यांनी ते तोंडात घेऊन बघावं. तोंडात घेतल्यानंतर तो आईस्क्रीमचा कोन आहे की मशाल, हे चटके बसल्यानंतर कळू शकतं,” असा टोला वायकर यांनी लगावला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *