Headlines

WhatsApp ग्रुप ॲडमिनची ताकद आणखी वाढणार, लवकरच मिळणार नवीन फीचर

[ad_1]

नवी दिल्ली :WhatsApp New Admin Feature : व्हॉट्सॲप आता अॅन्ड्रॉईडसाठी Admin Review नावाचं एक नवीन फीचर घेऊन येत आहे. या फीचरमुळे ग्रुप ॲडमिन त्यांच्या ग्रुपला आणखी चांगल्याप्रकारे मॉडरेट करु शकतात म्हणजेच अधिक चांगल्याप्रकारे लक्ष ठेवू शकतात. तर व्हॉट्सॲप हे आजकाल सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप आहे, अनेक महत्त्वाच्या चॅटिंग या व्हॉट्सॲपवर होत असतात. त्यामुळे व्हॉट्सॲपची सिक्युरिटी एक महत्त्वाची गोष्ट असते. त्यात व्हॉट्सॲपवर अनेक ग्रुप असून या ग्रुपची एकप्रकारे जबाबदारी त्या ग्रुप ॲडमिनकडे असते. आता याच ग्रुप ॲडमिनसाठी आता एक नवीन ॲडमिन रिव्ह्यू (Admin Review) हे फीचर आणत आहे.

वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात

व्हॉट्सॲपच्या नव्या फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetainfo च्या रिपोर्टनुसार हे फीचर सुरु होताच ग्रुपमधील मेंबर्स कोणत्याही नेमक्या मेसेजसाठी ग्रुप ॲडमिनला रिपोर्ट करु शकतात. ज्यानंतर ॲडमिन देखील योग्य नसणारा असा कोणीही केलेला मेसेज ग्रुपमधून पर्मनंटपणे डिलीट करु शकतो. रिपोर्टनुसार हा नवा ऑप्शन भविष्यात व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. या ऑप्शनमुळे रिपोर्ट केलेले मेसेज ॲडमिनसा एका वेगळ्या सेक्शनमध्ये दिसणार आहेत. हे अपकमिंग फीचर लवकरच बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!

आणखीही नवे फीचर लवकरच
याशिवाय समोर येणाऱ्या माहितीनुसार व्हॉट्सॲपमध्ये आणखी नवनवे फीचर्स येणार आहेत. यातील एक नवं फीचर येणार होतं, ज्यामुळे अनोळखी नंबरवरुन आलेला फोन व्हॉट्सॲपवर आपोआप सायलेंट होणार होता. तसंच ॲन्ड्रॉईड फोन्समधील व्हॉट्सॲपमध्ये एक नवा युजर इंटरफेस कंपनी घेऊन येणार आहे. ज्यामुळे ॲन्ड्रॉईडफोनमध्ये देखील आता ॲपल फोनप्रमाणे नेविगेशन बार खालच्या बाजूस दिसणार आहे.

वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *