Headlines

नवीन शैक्षणिक धोरण वंचित दुर्बल घटकांना शिक्षण नाकारणारे -दिपसिता धर (JNU विध्यार्थी नेत्या)

SFI अखिल भारतीय जत्थाचे सोलापूर स्वागत

सोलापूर – नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे गरीब, वंचित,दुर्बल घटकांसाठी शिक्षण नाकारणे होय. ज्यांच्या खिशात पैसे आहेत त्यांनीच शिक्षण घ्यावे असाच संदेश सरकार या नवीन शैक्षणिक धोरणातून देशातील जनतेला देत असल्याची टीका JNU विध्यार्थी नेत्या व SFI राष्ट्रीयसह सचिव दिप्सिता धर यांनी केली.SFI च्या अखिल भारतीय जथ्याचे आगमन आज सोलापूर येथे झाले असता त्यानिमित्ताने आज जाहिर सभेचे आयोजन एस एफ आय सोलापूर जिल्हा कमिटीच्यावतीने दत्तनगर येथे करण्यात आले होते. यानिमित्ताने त्या बोलत होत्या. या जत्थाच्या स्वागाध्यक्षपदी सिटूचे राज्य महासचिव ॲड एम एच शेख होतेदिपसिता धर पुढे तम्हणाल्या , “देशातील भाजप सरकार शिक्षणातून असमानता आणत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण करत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्मिती वेळी यांनी म्हंटले होते की शिक्षण हे मूलभूत अधिकार असावे ते फक्त यासाठी नव्हे की ज्ञान मिळाले तर त्यातून असमानता दुर व्हावी, गुलामी नष्ट व्हावी, माणसाला माणूस म्हणून जगता यावे. कोणीही शिक्षणापासुन वंचित राहू नये हे त्यांचे स्वप्न होते आणि यासाठी त्यांचा लढा होता. परंतू भाजप सरकार हे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.

शिक्षणातून एक चांगला जबाबदार माणूस घडविण्याच्या प्रक्रियेपासून आणखी देखील आपण मागे आहोत. राजस्थान मधील शाळेतील घटना ही आजच्या शिक्षण व्यवस्थेतील जात-पात उच्चनीचता अस्पृश्यता टिकून त्याचं वर्चस्व कायम असल्याचं दाखवून देते. शाळेतील शिक्षकाने एका विद्यार्थ्याला माठातील पाणी पिण्यासाठी स्पर्श केल्याने मारून टाकण्याची घटना ही अत्यंत खेद जनक व भयानक आहे. आपण कोणत्या व्यवस्थेकडे जात आहोत ? असा गंभीर सवाल त्यांनी यावेळी केला.

देशातील प्रत्येक मुलगी – मुलगा शिकला पाहिजे असे सरकारला वाटत नाही कारण जर तो शिकला तर तो प्रश्न करेल , सरकारला जाब विचारेल , त्याच्या अधिकारांसंधर्भात तो जागृत होईल ,तो नोकरी मागेन , समानतेची गोष्ट करेल , जाती-धर्माच्या बंधनात तो अडकणार नाही तो सजग होईल विवेकी होईल आणि सरकारला प्रश्न करू लागेल , तेव्हा या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकार देऊ शकत नाही. म्हणून देशातील युवकांना गुलाम करण्याचे धोरण या नवीन शैक्षणिक धोरणात आणून शिक्षणाची दारं बंद करण्याचे काम सरकार करीत आहे. म्हणून एस एफ आय शिक्षण वाचवा ! संविधान वाचवा !! देश वाचवा !!! ही घोषणा देत सबंध देशभर हा जात्था शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांसाठी काढलेला आहे.

शिक्षण वाचवा, संविधान वाचवा, देश वाचावा ही मुख्य घोषणा देत शिक्षणासाठी मार्च’ करत श्रीनगर आणि कन्याकुमारी येथून काढण्यात आले आहे. SFI चा अखिल भारतीय जत्था मागील १ ऑगस्टपासून संपूर्ण देशभर फिरत आहे. हा जत्था महाराष्ट्रात ११ सप्टेंबर पासून औरंगाबाद, बीड, नांदेड असे करत सोलापुरात बुधवार १४ सप्टेंबर रोजी आगमन झाले. त्यानिमित्ताने SFI सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने दि. १४ सप्टेंबर रोजी दत्त नगर समाज मंदिर येथे जत्थाचे स्वागत व जाहीर सभेचेआयोजन करण्यात आले होते.

या जाहीर सभेला मुख्य मार्गदर्शन राष्ट्रीय सहसचिव तथा जेएनयू विद्यार्थी नेत्या दिपसीता धर यांनी केले. या जत्थाच्या स्वागताध्यक्ष म्हणून सिटूचे राज्य महासचिव ॲड. एम एच शेख यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सहसचिव नितीन वाव्हळे, राज्य कमिटी सदस्य सुदेश इंगळे, छ्तीसगड राज्य निमंत्रक अर्चना या सर्वांनी उपस्थित विद्यार्थी वर्गास मार्गदर्शन केले आहेत. प्रस्ताविक जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जत्थाचे स्वागत व शुभेच्छा DYFI चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, अखिल भारतीय किसान सभा जिल्हा सचिव डॉ. शिवानंद झळके, जनवादी महिला संघटना जिल्हा सचिव शकुंतला पाणीभाते, सिटू चे सचिव सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू यांनी केले. कार्यक्रमाचे समारोप जिल्हा अध्यक्ष अतुल फसाले यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार यांनी केले आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी माजी राज्य सचिव दत्ता चव्हाण, मा.जिल्हा सचिव मीरा कांबळे, नम्रता निली, मा. जिल्हा अध्यक्ष अनिल चौगुले, किशोर झेंडेकर, जिल्हा सहसचिव राहुल जाधव, स.मं.सदस्य विजय साबळे, दत्ता हजारे, जि.क.सदस्य अनिल बोगा, शाम आडम ,नेहा वाघमोडे, रोहित सावळगी, तौसीद कोरबू, प्रतीक जाधव, एकनाथ काळे, श्रुतिका बल्ला, अमोल गुंड आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *