Headlines

Cannes मध्ये हरियाणी डान्सर सपना चौधरीला पाहून नेटकऱ्यांना धक्का; म्हणाले, ”टॅक्सीतून आलीस का?”

[ad_1]

Sapna Choudhary at Cannes: कान्स चित्रपट महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी भारतीय कलाकारांनीही कान्स चित्रपट महोत्सावाला (Cannes Film Festival) हजेरी लावली होती. हरियाणाची युट्यूबर सपना चौधरीनंही यावेळी कान्स महोत्सवात हजेरी लावली होती. परंतु यावेळी तिला लुक पाहून तिची तिच्या चाहत्यांनी प्रसंशा तर केली आहेच परंतु तिला ट्रोलही केले आहे. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे.

सपना चौधरीनं आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम पेजवरून कान्स चित्रपट महोत्सवाला (Cannes 2023) हजेरी लावल्याचे फोटो शेअर केले आहेत. परंतु यावेळी तिचा लुक तिला कॅरी करताना न आल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही (Sapna Choudhary Trolled) केले आहे. परंतु नक्की असं घडलं तरी काय? (spana choudhary gets trolled after wearing 30 kg pink colour gown at cannes vidoe viral)

सपना चौधरी आपल्या हटके डान्स स्टाईलसाठी ओळखली जाते. तिला अनेकदा तिच्या या स्टाईलमुळे ट्रोलही करण्यात येते. तिचे डान्स व्हिडीओ हे युट्यूबवर तूफान व्हायरल होत असतात. कोट्यवधी लोकं तिचे डान्स व्हिडीओ पाहतात आणि व्हायरल करतात. तिच्या डान्स कार्यक्रमांनाही प्रेक्षकांची उपस्थिती असते. ‘तेरी आखियाॅं का यो काजल’ (Sapna Chodhary Song) या गाण्यावरील तिच्या नृत्यानं सगळीकडे धुमाकूळ घातला होता. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. यावेळी तिनं कान्स महोत्सवाला हजेरी लावली होती. परंतु तिला ट्रोल करणाऱ्या मात्र ती कान्समध्ये पाहून धक्का बसला आहे. 

यावेळी सपनाच्या चाहत्यांकडून तिचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. एका युझरनं लिहिलंय की, ”अशा महिलांचा आदर केला पाहिजे ज्या आपल्या मातीला जगभरात ओळखत देतात.” तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ”कष्ट केल्यानं तुम्हाला जे पाहिजे ते मिळतेच.” तर हरियाणाहून कान्सला पोहचलेल्या या अभिनेत्रीचा कान्समधील जलवा पाहून तिचे प्रचंड प्रमाणात कौतुक केले आहे. 

हेही वाचा – अभिनेता आयुष्यमान खुरानाला पितृशोक! ज्योतिषाचार्य पी. खुराना यांचे निधन

ब्रुट इंडिया हिंदीनं पोस्ट केलेल्या व्हिडीओनुसार, सपनानं यावेळी 30 किलोचा गाऊन घातला होता. त्यावेळी तिला गाडीतून उतरताना आणि रेडकार्पटवर चालताना अडथळे येत होते त्यामुळे यावेळी तिला ट्रोलर्सनी ट्रोल केले. एकानं लिहिलंय की, ”टॅक्सीतून आलीस काय”, तर दुसऱ्यानं लिहिलंय की, ”जसे कपडे घालणं झपतं नाही तर घातला तरी कशाला”, तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ”हा लुक सुट नाही होत त्यापेक्षा सलवार कमीजचं छान आहे.”

सपना चौधरीच्या या व्हिडीओ चाहत्यांचे (VIDEO) तूफान लाईक्स आले आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय झाला आहे. या व्हिडीओ नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सही आल्या आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *