Headlines

नीता अंबानी यांच्या सुंदर लूकमागे आहे ‘या’ मेकअप आर्टिस्टचा हात, घेतो इतके मानधन

[ad_1]

Neeta Ambani MakeUp Artist : अंबानी यांच्या नावातच लक्झरी आहे. अंबानी यांचा प्रत्येक कार्यक्रमात एक वेगळाच थाट असतो. त्यांच्या कपड्यांपासून हिल्स, शूज किंवा मग चप्पलपासून त्यांचे लूक्स ते त्यांच्या मेकअप पर्यंत सगळ्या गोष्टी या चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या भारतातील लोकप्रिय आणि यशस्वी बिझनेस वुमन्स पैकी एक आहेत. नीता अंबानी यांच्या स्टाईलची आणि फॅशनची नेहमीच स्तुती करण्यात येते. त्यांच्या कार्यक्रमांना मोठे मोठे सेलिब्रिटी हजेरी लावतात. त्यावेळी नीता अंबानी यांचा लूक आणि मेकअप हा कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नसतो. 

नीता अंबानी वयाच्या 59 व्या वर्षी देखील खूप सुंदर दिसतात. त्यांची सुंदरता वाढवण्यामागे मिक्की कॉन्ट्रॅक्टरचा हाथ आहे. मिक्की हा अंबानी फॅमिलीचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे. तो फक्त ईशा अंबानी यांचा मेकअप आर्टिस्ट नाही तर त्यांची सून श्लोका मेहता अंबानी आणि ईशा अंबानीची देखील पर्सनल मेकअप आर्टीस्ट आहे. 

कोण आहे मिक्की कॉन्ट्रॅक्टर?

मिक्की कॉन्ट्रॅक्टर आधी टोक्योमध्ये हेयर ड्रेसरचं काम करत होता. त्यानंतर त्याची भेट बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री हेलनशी झाली, त्यानंतर हेलन यांनी मिक्कीला बॉलिवूडमध्ये येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मिक्कीनं बॉलिवूडमध्ये स्टायलिस्ट म्हणून पदार्पण केलं आणि आज तो भारतातील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट पैकी एक आहे. 

डीएनएनं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, मिक्की एका व्यक्तिचा मेकअप करण्यासाठी 75 हजार ते 1 लाख रुपये घेतो. मिक्की इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त व्यस्त असणाऱ्या मेकअप आर्टीस्ट पैकी एक आहे. मिक्कीकडे सतत कोणी ना कोणी मेकअप आर्टीस्ट करण्यासाठी अपॉइंटमेंट घेताना दिसतात. 

मिक्कीच्या क्लायंट्समध्ये फक्त अंबानी फॅमिली नाही तर त्यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा आणि अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. फक्त अभिनेत्रींचे काही कार्यक्रम असतील तेव्हाच नाही तर मिक्कीनं चित्रपटांसाठी देखील मेकअप केले आहेत. त्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर डॉन, दिल तो पागल है, कार्तिक कॉलिंग कार्तिक आणि माय नेम इज खानसारख्या अनेक चित्रपटांसाठी काम केलं आहे. 

हेही वाचा : जिजा कोणाच्या प्रेमात पडेल तेव्हा…’, आदिनाथ कोठारेनं लेकीच्या लव्ह लाइफविषयी केलं ‘हे’ वक्तव्य

नुकत्याच झालेल्या Nita Mukesh Ambani Cultural Centre मध्ये देखील नीता अंबानी, ईशा अंबानी आणि श्लोकाचा लूक हा पाहण्यासारखा होता. त्यांचा ज्या प्रकारे मेकअप करण्यात आला होता. ते पाहता त्या कोणत्याही अभिनेत्री आणि मॉडेल पेक्षा कमी दिसत नव्हत्या. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *