Headlines

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव, रोहित पवारांचा मोठा दावा, म्हणाले “पवार कुटुंबात मतभेद…” | NCP Rohit Pawar Alleged Opponents Could target us after Shivsena sgy 87

[ad_1]

ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हा दावा केला आहे. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे असंही सांगितलं.

तुमच्या आणि अजित पवारांच्या नात्यात दुरावा असल्याची चर्चा अनेकदा झाली. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही”.

Andheri Election: भाजपाने माघार घेतल्यानंतर टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं, स्पष्ट शब्दांत म्हणाले “कशाला उगाच…”

पुढे ते म्हणाले “आमची सर्वांचं उद्दिष्ट् स्पष्ट आहेत. सुप्रिया सुळेंना लोकसभेत, अजित पवारांना राज्यात आणि मला सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे. पण विरोधकांना ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रमाणे आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटत आहे. शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो”.

अजित पवारांची प्रतिक्रिया

रोहित पवार यांच्या दाव्यावर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की “रोहितला या विधानामागचा अर्थ नेमका काय आहे ते विचारतो. भाजपा, काँग्रेस, मनसे, उद्दव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावं”.

“अलीकडच्या काळात वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मला काही दिवसांपूर्वी किती दिवस सरकार टिकणार या प्रश्नावर, १४५ चा आकडा आहे तोपर्यंत हे सरकार टिकेल असं सांगितलं होतं. पण मी वेगळं काहीतरी बोलल्याचं सांगण्यात आलं. मला काय करायचं आहे. मला खूप काम आहे. त्यांचं त्यांना लखलाभ आणि आमचं आम्हाला,” असंही अजित पवार म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *