Headlines

ncp Jayant patil hit shinde fadnavis government for not declaring wet drought in maharashtra zws 70

[ad_1]

सांगली : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच फार मोठे नुकसान झालं आहे, मात्र राज्यसरकार कडून ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा आणि अभ्यास मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील हे बोलत होते.जिथे जिथे लोकांचे नुकसान झाले अशा सर्व तालुक्यांमध्ये ओला दुष्काळाच्या उपाययोजना ताबडतोब सुरू केल्या पाहिजेत, अशी मागणी ही आ. पाटील यांनी यावेळी केली.

हेही वाचा >>> सात महिने पगार नाही, वाहन भत्त्यासह करोना भत्ताही बेपत्ता; भरारी पथकातील अनेक डॉक्टरांची व्यथा!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आता गुजरातच्या निवडणुका लढवणार आहे, आपण हिंदू देवतांना मानतो हे दाखवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत असावेत. नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आहे, कारण गांधींना जगमान्यता आहे. आता नोटेवर देव देवता आणि महापुरुषांचे फोटो लावणे अशा मागण्या पुढे येत असून त्यामुळे वाद निर्माण होतील त्यामुळे, आता जी पद्धत आहे तीच चालू ठेवणे योग्य आहे, अस सांगून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. पाटील, पुढे म्हणाले, आपल्या देशात आपण अनेक देवांना मानतो, गाईच्या पोटामध्ये तर ३३ कोटी देव आहेत. त्यामुळे कुठल्या देवाचा फोटो छापावा असा प्रश्न निर्माण होईल. आणि त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे केजरीवाल यांची सूचना स्वीकारणे  सोपे नाही, असा टोला ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *